गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;
मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.
गि~हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;
स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.
गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.
काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.
काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.
गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!
khupach chhan ..
उत्तर द्याहटवाchaan
उत्तर द्याहटवाCHANnnn
उत्तर द्याहटवासार्वमत पेपर लेख
उत्तर द्याहटवासूनिल पगार यांचा
उत्तर द्याहटवाHe example kontya alkarancge ahe
उत्तर द्याहटवास्वभावोक्ती
हटवाफार छान...
उत्तर द्याहटवाकुठला अलंकार आहे?
उत्तर द्याहटवाSwabhavokti
हटवायथार्थ वर्णन, फारच छान
उत्तर द्याहटवाहिंदवंदना ही चंद्रशेखर गोर्हे यांची कविता कृपया पोस्ट करावी.
उत्तर द्याहटवाAdv.Vishnu Bhope Aurangabad
vdbhope@yahoo.com
स्वभावोक्ती अलंकार उत्तम उदाहरण.
हटवा