आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.
चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटें झाली;
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.
ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.
ओशाळला येथे यम,
वीज ओशाळली थोडी,
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.
मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
Hi kavita aamhala shalet hoti. far chan kavita aahe. me parat ekda shalet shikavalelya chalit mhanun pahili. Majja aali... Thanks for it.
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या .
उत्तर द्याहटवा१नंबर
उत्तर द्याहटवा👌श्रावण महिण्याचे सुंदर वर्णन
उत्तर द्याहटवासुन्दर
उत्तर द्याहटवाApratem Bal sitaram mardhekar navkaviteche janak
उत्तर द्याहटवाmalahi shalet hoti hi Kavita fa aawdte mala kadhihi tichi aathvan aali ki man bhijun ole chimb hote ya Kavitene !!Dhanywad !!!
उत्तर द्याहटवाChhan ahe kavita shalet hoti
उत्तर द्याहटवाआम्हाला होती हि कविता, वर्गात आम्ही सर्वजण चढाओढीने गात होतो . खूप छान आहे.आज त्या आठवणी जाग्या झाल्या, बालपणीच्या. " धन्यवाद "
उत्तर द्याहटवा