ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.
चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.
झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.
बऱ्याच मेहनतीनंतर हि अप्रतिम कविता मला गवसली. धन्यवाद.
उत्तर द्याहटवाFarach sundar Ashi hi Kavita samikshakanahi awhan karate
हटवाआज 5 मे. बालकवी यांचा स्मृतिदिन ...आणि ही कविता अप्रतिम
उत्तर द्याहटवामन हरवून जातं, कविता वाचता वाचता
उत्तर द्याहटवाआज बालकवी न मुळे बालपण परत एकदा गवसले...
उत्तर द्याहटवा