सोमवार, १८ डिसेंबर, २००६

सायंकाळची शोभा - भा.रा.तांबे

पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर
झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी
हिरवेहिरवे गार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालिचे
सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे ईंद्रघनुष्याचे
अशी अचल फुलपाखरे, फुले साळिस जणू झुलती
साळीवर झोपली जणूं का पाळण्यांत झुलती.
झुळकन सुळकन ईकडून तिकडे किती दुसरी उडती!
हिरे माणकें पांचू फुटुनी पंखचि गरगरती!
पहा पांखरे चरोनि होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा?

१७ टिप्पण्या:

  1. Khupc Chan aahe kaviKa.mi shalet Astana MLA 4th mde hi kvita hoti.ajun hi MLA hi kvita khup aavdte ..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हो चौथीला होती ही कविता..आमच्या बाई समरसून शिकवायच्या..खूपच छान..nostalgia

      हटवा
  2. Khupc Chan aahe kaviKa.mi shalet Astana MLA 4th mde hi kvita hoti.ajun hi MLA hi kvita khup aavdte ..

    उत्तर द्याहटवा
  3. कितीतरी शोधत होते.कविंचे नाव आठवत नव्हते.शेवटी type केले " कुठे बुडला पलिकडील तो सोन्याचा गोळा "

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खुप शोधत होतो आणि आज सापडली कविता. ...आस वाटत उगीच मोठे झालो .....लहानपणी च छान होत

      हटवा
  4. आयुष्यभर लक्षात राहील अशी कविता...!

    उत्तर द्याहटवा
  5. ह्या कवितेचे स्पष्टीकरण कुणी देईल का?

    उत्तर द्याहटवा
  6. मी चौथीच्या वर्गात होतो तेव्हा खूपच आवडायची ही कविता आणि आजही।

    उत्तर द्याहटवा
  7. Ho 4th Standard la hoti hi kavita . Khup chan sayankalach warnan aahe aani ti shobha Khedyatach pahili pahije.

    उत्तर द्याहटवा
  8. Mala hi kavita khup aawdte. Mi ajunahi hi kavita mazya mulala gavun sangte😁

    उत्तर द्याहटवा
  9. ही कविता आम्हाला मराठीच्या पुस्तकात अभ्यासाला होती. हा अनुभव आम्ही खूप वेळा प्रत्यक्ष घेतला आहे.

    उत्तर द्याहटवा