निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजीशी
कुठे गर्द बांबूची बेटे
जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापॆ
सुखांसवे होऊनी अनावर
तारांमधला पतंग कोठे
भुलूनी गेला गगनमंडला
फ़णा डोलवित झोंबू पाहॆ
अस्तरवीच्या कवचकुंडला
उंचवट्यावर म्हशी गोठल्या
तसेच कोठे कातळ काळे
वर्ख तृप्तिचा पानोपानी
बघून झाले ओलेओले
कुठे तुटल्या लाल कड्यावर
चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला
सटीनकांति गोरे गोरे
फूललपंखरी फूलथव्यांवर
कुठे सांडली कुंकुमटीम्बे
आरसपानी पाण्यावरती
तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे
कुठे आवळीवरी कावळा
मावळतिचा शकून सांगे
पूर्वेला राउळ इंद्राचे
कोरीव संगमरवरी रंगे
घाटामध्ये शिरली गाडी
अन रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्रवीण
अजूनी करते दिडदा दिडदा.
apratim! yethe kavita dilyabaddal dhanyavad.
उत्तर द्याहटवाUttam! aapla upakram stutya aahe. apan itarana sudhha ashaprakare kavita yethe pathavinyas sandhi dili tar aapla sangraha farach changla hoyeel.
उत्तर द्याहटवाumesh.
खुपच छान! मलाही आवडलेल्या कविता लिहायला आवडेल पण कसे लिहायचे?
उत्तर द्याहटवाआभार, सुचेताजी!
उत्तर द्याहटवाआपल्यालादेखिल ह्या उपक्रमावर सहभागी व्ह्यायचे असल्यास padmakar dot khandekar at gmail dot com वर माझ्याशी जरूर संपर्क साधा!