देणार्याने देत जावे;
घेणार्याने घेत जावे.
हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.
वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
प्रुथ्वीकडून होकार घ्यावे.
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी
देणार्याने देत जावे;
घेणार्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे !
Chaan
उत्तर द्याहटवाआगदी खरे आहे
उत्तर द्याहटवादेणाऱ्या व्यक्तीचा दातृत्वाचा गुण घेण्यासारखा आहे .
उत्तर द्याहटवा