स्वातंत्र्याचा सण, दारात रांगोळी
श्रुंगारली आळी, झगमगे ||
तोरणे, पताका, सांगती डोलुन
स्वांत्र्याचा दिन, उगवला ||
स्वातंत्र्यासाठी या, आम्ही काय केले?
पुर्वज श्रमले, तयासाठी ||
वृक्ष लावणारे, निघोनिया जाती
तळी विसावती, सानथोर ||
विचारी गुंतत, हिंडलो बाजारी
पेठेत केवढी, गजबज ||
केवढी धांदल, केवढा उल्हास
केवढी आरास, भोवताली ||
मात्र एका दारी, दिसे कोणी माता
दीप ओवाळीता छायाचित्रा ||
ओल्या नेत्रकडा हळुच टिपुन
खाली निरांजन, ठेवीत ती ||
हुतात्म्याचे घर, सांगे कुणी कानी
चित्त थरारोनी, एकतसे ||
होते लखाखत, पेठेतले दीप
आकाशी अमूप, तारा होत्या ||
चित्तापुढे माझ्या, एक दीप होता
एक अश्रु होता, माउलीचा. ||
सुरुवातीच्या दोन ओळी माहिती होत्या कविता शोधत होतो शेवटी मिळाली कवितेचे नाव सुद्धा माहिती नव्हत थँक्यू
उत्तर द्याहटवा