मंगळवार, २० फेब्रुवारी, २००७

या झोपडीत माझ्या - संत तुकडोजी महाराज

या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥

२६ टिप्पण्या:

  1. शाळेचे दिवस आठवले, जून्या आठवणीं प्रत्यक्ष झाल्या...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सन १९८३ला सातवीला कविता होती.शिक्षकांनी शिकवण्यास तीन दिवस लागले.

      हटवा
    2. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
      प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

      हटवा
    3. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
      प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

      हटवा
  2. गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी

    उत्तर द्याहटवा
  3. असे वाटते कि पुन्हा तो दिवस यावा आणि पुन्हा ती शाळा असावी पण ती कधीच बंद नसावी.

    उत्तर द्याहटवा
  4. साधे राहणीमान या विषयावर तुमचे मत सांगा

    उत्तर द्याहटवा
  5. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांंनी समाधानी जगण्याचा सोपा उपाय सांगितला आहे. 👌🙏

    उत्तर द्याहटवा
  6. प्रत्युत्तरे
    1. वस्तू साधन, या मध्ये आराम आहे सुख नाही,. सुख शांति विचारात आहे,मानन्यावर आहे.ओम शांति.

      हटवा
  7. एकदम छान कविता .जीवन जगताना महत्वकांक्षा जरुर असावी पण आहे त्या गोष्टीत समाधान मानावे.तरच माणूस सुखी राहतो .अप्रतिम कविता

    उत्तर द्याहटवा
  8. कवितेत वास्तविकता आहे पुन्हा पुन्हा वाचावी अशी आहे

    उत्तर द्याहटवा
  9. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी ना बोजा या झोपडीत माझ्या...

    खूपच सहजता आहे...

    उत्तर द्याहटवा
  10. जर आपण या वेबसाईट वर कवितेचा भावाथॆ दिला तर खुप बरे होईल🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  11. लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव मिळू शकतो हे पटवून देणारी सुंदर कविता.सुख मानण्यावर असते.

    उत्तर द्याहटवा
  12. सुख शांति आपल्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे, बाह्य साधनांवर नाही. अधिक मिळवायची महत्वकांक्षा ठेवायला पाहिजे पण मिळेल त्यात समाधान मानून पुढे प्रयत्न करत रहायचे.

    उत्तर द्याहटवा