शर आला तो धावुनी आला काळ
विव्हळला श्रावण बाळ
हा ! आई गे ! दीर्घ फोडूनी हाक
तो पडला जाऊन झोक
ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी
हृदयाचे झाले पाणी
त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणुनी नयनी
तो वदला हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा
मग कळवळूनी
नृपास बोले बाळ
कशी तुम्ही साधीली वेळ
मम म्हातारे माय-बाप तान्हेले
तरुखाली असती बसले
कावड त्यांची
घेवून मी काशिला
चाललो तीर्थयात्रेला
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगबग भरूनी झारी
जो परत फिरे
तो तुमचा शर आला
या उरात रुतुनी बसला
मी एकुलता पुत्र कसा हा घाला
मजवरती अवचित आला
त्यां वृध्दपणी
मीच एक आधार
सेवेस आता मुकणार
जा बघतील ते
वाट पाखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
आहेत अंध ते दोन्ही
दुर्वार्ता फोडू नका ही
ही विनती तुमच्या पायी
मज माघारी करा तुम्ही सांभाळ
होउनिया श्रावण बाळ
परी झांकुनी सत्य कसे हे राहील ?
विधीलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटून शोकावेगे
ते येतील माझ्यामागे
घ्या झारी... मी जातो.. त्याचा बोल
लागला जावया खोल
सोडीला श्वास शेवटला
तो जीव - विहंग फडफडला
तनु - पंजर सोडूनी गेला
दशरथ राजा रडला धायी धायी
अडखळला ठायी ठायी
Sundar kavita. Mazya lahanpani mazi aai hi kavita mhanaychi. aaj khup varshanantar vachayla malali.
उत्तर द्याहटवात्याचे शेवटचे कडवे पण आहे, माझी आजी बोलायची पण ते कुठेच सापडत नाही
उत्तर द्याहटवाआशय असा आहे की
दशरथ राजा जातो आणि त्यांना पाणी देतो आणि कावड उचलतो पण ते आंधळे विचारात की बाळा तू काही बोलत का नाहीस, तेव्हा दशरथ राजा खरं सांगतो तेव्हा ते त्याला श्राप देतात की जसे आम्हीं पुत्र वियोगाने मेलो तसा च तू पण मरशील नंतर ते अंध दोघे प्राण त्यागतात
Khup Chan mitra... Mazya aai chay shalet hi kavita hoti... She sings it today.. thanks again brother.
हटवामस्त कविता, आठवण झाली शाळेच्या दिवसाचं
उत्तर द्याहटवाएक तो हरी कुशल बहुपरी जयाची माया ।।
उत्तर द्याहटवातो रक्षी जगाला साऱ्या नमूं गा तया ।।
👆 ही कविता आहे का तुमच्याकडे 9767994847🙏
Plz
हटवासुंदर आशय आणि आवाज ,ऐकताना डोळ्यात अश्रू अनावर होतात.
उत्तर द्याहटवाऊत्तम डोळ्यात पाणी आणणारी कविता.
उत्तर द्याहटवामाझे आई-वडील दोघेही कविता म्हनतात आणि सांगतात
उत्तर द्याहटवावर्ग 4थीची कविता आहे
खूप छान कविता. लहानपणी सुध्दा म्हणताना डोळ्यात अश्रू येत. जुन्या कवितांचा अमोल ठेवा शोधून डिजिटल फॉर्ममध्ये आणण्याचे मोठे काम करीत आहात
उत्तर द्याहटवाखालील कविता संपूर्ण आठवत नाही. ह्या वयात मेमरी दगा देते. सगळी कविता आणि कवी कोण आहेत हे शोधून मदत कराल का. धन्यवाद.
मी बाई कोकिळ वनांची राणी, गाईन सुंदर गोड गाणी ,घुमतील रानी सुस्वर माझे ,म्हणतील कोणी वीणा वाजे;लपून बसेन मी झाडांमध्ये, गाईन पंचम सुरामधे,येईल का पण कुणी ऐकयला,माझ्याशी रानात खेळायला?...
[5/31, 8:13 AM] Bharati Thite: ही कोण आली सुळुक सुळुक,अगबाई ही तर वार्याची झुळुक,वार्यावर नाचते परी जशी हळूच फुंकर घालते कशी, अग अग झुळुके पवना राणी, काय गं म्हणतेस वसंतराणी,येतेस का माझ्याशी खेळायला? नाही गं बाई , जाते मी मोठ्या कामाला,बंगलीत जाईन अमीरांच्या, झोपडीत जाईन गरीबांच्या ,देईन हवा अन् जगवीन जीवां,सार्या जगाचा होईल विसावा,कोकिळ राणी तुम्ही तर सार्या मुलखाच्या आळशी कोण हो खेळेल तुमच्यापाशी?
Who written this poem
उत्तर द्याहटवाकविता वाचून बालपणीच्या विद्यार्थी दशेतील आठवणी ताज्या झाल्या
उत्तर द्याहटवाआमच्या लहानपणी पण खूप सुंदर कविता होत्या,चलबद्ध म्हणता यायच्या.....खूप अर्थपूर्ण कविता असत
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर कविता 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाएक कडवे होते वाटते.अजून
उत्तर द्याहटवाआतिशय सुंदर कविता..ग.ह,पाटील...ग्रेट कवि.
उत्तर द्याहटवाअतिशय छान कविता..ग.ह.पाटील ग्रेट कवी
उत्तर द्याहटवारामा कधिरे येशील धावून ।
उत्तर द्याहटवाव्याकूळ सीता वनात।
हे गीत कुठे मिळेल
पोस्ट करा कृपया