शनिवार, १० मे, २००८

लिहिताना - इंदिरा संत

अडखळे लिहिताना
हात कधी अवचित
आणि निरखून डोळे
पहातात अक्षरात

कानावेलांटीचा डौल,
मोड तशी अक्षराची
कधी द्यावी, कधी नाही
रेघ अक्षरावरची

नकळत उमटली
कुणाची ही काय तऱ्हा
इवल्याशा रेषेमाजी
भावजीवनाचा झरा

नव्हेतच अक्षरे ही;
स्मृतीसुमनांचे झेले
एकाएका अक्षरात
भावगंध दरवळे

म्हणूनीच लिहिताना
अवचित थांबे हात;
धुके तसे आसवांचे
उभे राही लोचनांत

1 टिप्पणी:

  1. धन्यवाद पद्माकर ! ही इतकी सुरेख कविता वाचायची संधी दिल्यावद्दल.

    उत्तर द्याहटवा