शुक्रवार, २० जून, २००८

या बाळांनो, या रे या ! - भा. रा. तांबे

या बाळांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !

मजा करा रे मजा करा !
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे तोचि फसे;
नवभूमी दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया !

खळखळ मंजुळ गाति झरे,
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुले फळे,
सुवास पसरे, रसहि गळे.
पर ज्यांचे सोन्याचे
ते रावे, हेरावे.
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया

१७ टिप्पण्या:

  1. मित्रा, तुला माहित नाही, तू किती छान काम करतो आहेस‌! आम्हाला तुझा हा प्रयत्न खरोखर खूपच आवडला. तुला धन्यवाद द्यावेत तितके कमीच आहेत. कृपया, आता थांबू नका! लिहिते रहा...

    उत्तर द्याहटवा
  2. मराठी किती स‌ुंदर आहे, याची मलमली जाणीव हे असं काही वाचलं, की स‌ारखी होत राहते..
    पुन्हा एकदा धन्यवाद!
    आपला,
    विसोबा खेचर.

    उत्तर द्याहटवा
  3. आपली कविता माझा लहान भाऊ परीपाठात सादर करणार आहे

    उत्तर द्याहटवा
  4. या कवितेत अजून काही ओळी होत्या त्या कां नाही इथे दिल्या ?
    वाहता निर्झर मंदगती डोलता पताका वृक्षतटी
    पक्षी मनोहर कूजित रे कोणाला गातात बरे..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुमच्या ओळी वरिल 'या बाळांनो या रे या' मधील नाहीत तर,'इकडे तिकडे चोहीकडे, आनंदीआनंद गडे' या कवितेतील आहेत. मात्र वरिल कवितेत सर्व कडवी नाहीत हे खरेच.

      हटवा
  5. बालपण आठवलं रे मित्रा..
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  6. कवीनचे नाव का बरं दिले नाही ! त्याचा साठी आलो होतो

    उत्तर द्याहटवा
  7. आज माझे वय ५६ वर्ष आहे, मला चवथीला असलेली ही कविता आजही मुकाम, तोंडपाठ आहे. धन्य ते आमचे डेरे गुरुजी...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपण बुलढाण्याच्या शाळेत होतात काय ? डेरे गुरुजींवरून तसे वाटले .

      हटवा
  8. एक कविता आठवते--
    खुजबुज खुजबुज खुजबुज रे
    चंदनाच्या झाडाखाली माती का गळे.

    ही कविता कुणाची? पुढच्या ओळी काय?
    Thank you.

    उत्तर द्याहटवा
  9. एक कविता आठवते--
    खुजबुज खुजबुज खुजबुज रे
    चंदनाच्या झाडाखाली माती का गळे.

    ही कविता कुणाची? पुढच्या ओळी काय?
    Thank you.

    उत्तर द्याहटवा
  10. मित्रा, Love you.... खरच रे तुझ्या प्रयत्ना मुळे आज शाळा आठवली.... 👍🙏💐🙏

    उत्तर द्याहटवा