जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’ !
मी जाता राहिल कार्य काय ?
सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल,
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय ?
मेघ वर्षतिल, शेते पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,
कुणा काळजी की न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय ?
सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल,
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जाता त्यांचे काय जाय ?
रामकृष्णही आले, गेले !
त्याविण जग का ओसचि पडले ?
कुणी सदोदित सूतक धरिले ?
मग काय अटकले मजशिवाय ?
अशा जगास्तव काय कुढावे !
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ?
फार सुंदर, वास्तविक शालेय अभ्यासक्रमात होती.
उत्तर द्याहटवाफार सुंदर, वास्तविक शालेय अभ्यासक्रमात होती.
उत्तर द्याहटवालहानपणापासून मनात घर केलेली ,कविता
उत्तर द्याहटवालहानपणापासून मनात घर केलेली खुप सुंदर कविता
उत्तर द्याहटवाखूप छान कविता आहे . आयुष्यचे सार आहे.
उत्तर द्याहटवाखूपच छान जून्या शाळेतील आठवनीना उजळा मिळाला मन भरून आले
उत्तर द्याहटवाशब्दच अपुरे आहेत मस्त
उत्तर द्याहटवाहे गाणे सर्वकाळासाठी लागू असल्याने आणि त्याचा शब्दार्थ अत्यंत व्यवहार्य असल्याने ते मला आवडते.
उत्तर द्याहटवामाझ वय 51 आ हे,मा झ्या अजूनही पाठ आ हे ,माझे शालेय जीवनातील आवडलेली हि कविता आ हे
उत्तर द्याहटवामाझ वय 51 आ हे,मा झ्या अजूनही पाठ आ हे ,माझे शालेय जीवनातील आवडलेली हि कविता आ हे
उत्तर द्याहटवाक्षणभंगुर आयुष्याचं यथार्थ वर्णन केलेली कविता
उत्तर द्याहटवा