गुरुवार, २९ जानेवारी, २००९

दुबळी माझी झोळी - ग. दि. माडगूळकर

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,

हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी,
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी,

एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,

महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया,
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया,

गोठविनारा नको कडाका नको उन्हाचि होळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी..

होते तितुके देइ याहुन हट्ट नसे गा माझा,
सौख्य देइ वा दुःख ईश्वरा रंक करि वा राजा

अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.

६ टिप्पण्या:

  1. हे गीत सु्र्व्यांचे नसून ग.दि.माडगूळकरांचे आहे. १९६१ साली आलेल्या ’प्रपंच’ चित्रपटात सुधीर फडके ह्यांनी संगीतबद्ध करून गायलेले आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. हि कविता ग.दि.माडगूळकरांची आहे. प्रपंच चित्रपटातील हे गीत आहे.
    शुभांगी राव

    उत्तर द्याहटवा
  3. श्री. मिलिंद / शुभांगी,
    आपण सुचवलेल्या दुरुस्तीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! अंमळ उशीराने का होईना दुरुस्ती केली आहे. देर से आए पर दुरुस्त आए/

    उत्तर द्याहटवा
  4. मी रवींद्र हरि अभ्यंकर..पुणे आज आपल्या संग्रहातील कविता वाचल्या..आवडल्या. अण्णा माडगुळकरांची ही कविता माझी आवडती आहे...कवितेतील मजकूर एकदोन ठिकाणी वेगळा वाटला म्हणून लिहितो आहे जरा पाहून घ्यावे अशी विनंति
    हवाच तितुका पाडी पाउस देवा वेळोवेळी
    चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी
    एकवितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी

    सोसे तितुके देई देवा हट्ट नसे गा माझा
    सौख्य देइ वा दु:ख ईश्वरा रंक करी वा राजा
    अपुरेपणही नलगे,नलगे पस्तावाची पाळी

    उत्तर द्याहटवा
  5. आणखी एक पाठभेद सापडला. कृपया तपासावा
    महाल माड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया
    गरजेपुरती वसने देई जतन कराया काया

    उत्तर द्याहटवा