( कवितेच्या शीर्षकाबद्दल खात्री नाही आहे, कृपया जाणकारांनी दुरुस्ती सुचवावी )
दोष असती जगतात किती याचे
नसे मजला सामर्थ्य गणायाचे,
दोष माझा परि हाच मला वाटे
दोष बघता सत्प्रेम कसे आटे?
दोष असती जगतात, असायचे
मला त्यांशी तरि काय करायाचे?
प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही
शुद्ध होई न जो -दोष असा नाही.
गड्या पूर्णा! मज आस तुझी नाही
सख्या न्युना, ये मार मिठी देही
प्रीति माझ्या ह्रदयात करी वास
न्युनतेला पूर्णत्व द्यावयास!!
दोष असती जगतात किती याचे
नसे मजला सामर्थ्य गणायाचे,
दोष माझा परि हाच मला वाटे
दोष बघता सत्प्रेम कसे आटे?
दोष असती जगतात, असायचे
मला त्यांशी तरि काय करायाचे?
प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही
शुद्ध होई न जो -दोष असा नाही.
गड्या पूर्णा! मज आस तुझी नाही
सख्या न्युना, ये मार मिठी देही
प्रीति माझ्या ह्रदयात करी वास
न्युनतेला पूर्णत्व द्यावयास!!
'गड्या पुर्णा! मज आस तुझी नाही'
उत्तर द्याहटवापुर्णा - - > पूर्णा , पुर्णत्व -> पूर्णत्व
कविता छापण्याआधी ती म्हणून पहा, म्हणजे र्हस्वदीर्घाचे अनेक दोष टाळता येतील. छंदाचे नियम पाळण्यासाठी जिथे ज़ाणून अशुद्ध रूप वापरले आहे, तिथेही ते तसेच वापरण्याची खबरदारीही घेता येईल.
उदा. 'प्रसंगी अखंडीत वाचीत ज़ावे' मधे 'अखंडित' हे शुद्ध रूप वापरायला नको.
दुरुस्ती केली. पण, नंतरच्या जोडाक्षरामुळे ह्रस्व अक्षर देखील गुरु मानले जाते ना? ज्यामुळे 'र्ण' त्याआधीचे अक्षर देखील गुरु बनवते. (उदा. अर्णव) ? (चुकीचे असल्यास कृपया सुधारणा सांगावी)
उत्तर द्याहटवा