रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे
मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
"प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !"
आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात
मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !
पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशिल देवा, तूं अपुले खास;
असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !
kupach chhan aahai kavita
उत्तर द्याहटवाभावनिक प्रश्न आहे.
उत्तर द्याहटवायेशूच्या भक्तांचे काय मत आहे या कवितेवर?
प्रभुच्या काळजातली जखम ओळखणार की पापाचे करविते प्रभूचे दास नाहीच म्हणून सांगणार?
कठीण प्रश्न आहे, पण इतर भाविकांना सुद्धा मत स्पष्टपणे सांगणे महत्वाचे आहे. यातच प्रभूच्या शिकवणीची परिक्षा आहे.
प्रेम, धन्यवाद.
उत्तर द्याहटवाप्रशांत, आमेन!
जालियनवाला बाग कवितेचे कवी
हटवाकवी कुसमाग्रज
हटवा