बुधवार, २८ जानेवारी, २००९

आई म्हणोनी कोणी - यशवंत

ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.
चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई
शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’
ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’
आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे
गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला
येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे

८२ टिप्पण्या:

  1. "aai mhanoni koni aais hak mari"
    hi kavita mi lahan asatana mala abhyasala hoti.hi majhi aawadati kavita aahe.syllabus change jhalyamule hi kavita mala baryach diwas prayatna karunahi sapadali nahi,pan aaj mala hi kavita bhetali'i am so happy.'it's my fevourit poem.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कोणीही कविविषयी फारसे बोलताना दिसत नाही. कवी यशवंत म्हणजे मला वाटते यशवंत दिनकर पेंढरकर. अत्रेंनी श्यामची आई मध्ये गुरूजींच्या तोंडी ही कविता घातली असली तरी प्रत्यक्षात गुरूजींना ही कविता आईच्या प्रेमासाठी अभिप्रेत होती ता असा प्रश्न मनात येतो

      हटवा
    2. बरोबर... मला पण मी लहान असतांना ही कविता मला चौथ्या वर्गात होती. आम्ही सर्व त्यावेळेस गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे अगदी चालीत ही कविता म्हणायचो, कदाचित त्यामुळेच या कवितेचा पहिला कडवा मला आजही मुखपाठ आहे. खूप सुंदर कविता.

      हटवा
    3. ही कविता मला फार आवड्याशी असज पण ते दिवस फार फार मिस करतो त्या वेळेस मी चौथीच्या पुस्तकांत होती ही कविता

      हटवा
    4. आई वडिलांची तीव्र आठवण येते
      असे वाटते की कधी एकदाचे आई वडिलांना भेटतो
      त्यांच्या भेटीविना जीव कासावीस होतो

      हटवा
  2. aai mhanoni koni aais hak maari he mazi 4th std. madhil kavita hoti .mala aj he athawat ahe amhi sarvani melun hya kavitel chaal lawali hoti fakt tya chali mule aaj paryant tekavita mazi path ahe . tenwa tar arth samajat nawata amhi phar lahan hoto.pan manapasun ekach watat ki ek weles konala wadil nasale tari chalel , pan aai sarwana asaylach pahije.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कविता वाचुन आई ची फार आठवण झाली. मन गहिवरुन आल आणि डोळे पाणावले.

      हटवा
    2. कविता वाचुन आई ची फार आठवण आली.मन गहिवरुन आल आणि डोळे पाणावले.

      हटवा
    3. कविता वाचुन आई ची फार आठवण झाली. मन गहिवरुन आल आणि डोळे पाणावले.

      हटवा
    4. Hi kavita mala ४थी la hoti aaj punha vachatana lahanpaniche gavachya shaleche diwas athawale aani dolyatun aanandashru aale... Thank u so much

      हटवा
  3. "aai mhanoni koni aais hak mari"
    hi kavita mi lahan asatana mala 4thi la abhyasala hoti.hi majhi aawadati kavita aahe.syllabus change jhalyamule hi kavita mala baryach diwas prayatna karunahi sapadali nahi,pan aaj mala hi kavita bhetali'i am so happy.'it's my fevourit poem. pan yethe ardhich ahe " shaletuni gharala yeta dharil poti, kadhun thewi lele to ghas dei othi .............................................................................................................................................." nahi

    उत्तर द्याहटवा
  4. kaharach.. khup.. khup kahi sangun jatat hya kahi oli. aaj me maza aai pasun khup khup dur aahe ani jagat kontihi ashi vyakti nahi ji aai chi jaga ghue shakel ani jicha jawal me maza manatlya saglya goshti sangu shakel.. lahan astana hya kavitecha arth kinchithi kalat navta pan aaj he kavita wachtana aai chya mayecha godwa janvto ani dolyatun ashru oghalu lagtat.. really "SWAMI TINHI JAGACHA AAI WINA BHIKARI".. ;-(

    उत्तर द्याहटवा
  5. 70"Aai" hi kavita mi 4th std madhe shikle.he kavita fakt kavita nasun aaiche mahattva yat darshwile aahe...jevha jevha ragvayachi kinva rusayachi,,,tevha aai che bol aikayla kan aatur vhayche pan aaj hi kavita wachun mazya dolyant fakt yetat te "Ashru"
    Aaj mazi AAi ya jagat nasli tarihi tiche he dilele anmol jivan yat ti aahe hyachi janiv mala asun majyat ti aahe hyachi mala anubhuti hote
    "I MISS MY AAI:"
    I LOVE YOU AAI

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. aaiche mahattva नव्हे तर आई म्हणजे प्रेम जिव्हाळा ममता वात्सल्य असे अनेक पैलू निदर्शनास येतात ते फक्त आई या एकाच ठिकाणी ते एकवटले आहे याची सर कुणालाही यायची नाही

      हटवा
    2. aaiche mahattva नव्हे तर आई म्हणजे प्रेम जिव्हाळा ममता वात्सल्य असे अनेक पैलू निदर्शनास येतात ते फक्त आई या एकाच ठिकाणी ते एकवटले आहे याची सर कुणालाही यायची नाही

      हटवा
    3. aaiche mahattva नव्हे तर आई म्हणजे प्रेम जिव्हाळा ममता वात्सल्य असे अनेक पैलू निदर्शनास येतात ते फक्त आई या एकाच ठिकाणी ते एकवटले आहे याची सर कुणालाही यायची नाही

      हटवा
  6. HI KAVITA SHIKAVAT AASATANA MAZI GAJARE MADAM RADALI HOTI..........TEVA MI TYANA VICHARAL KA RADAT AAHAT.....TYA BOLALYA MAZI AAI NAHI.......MALA TICHI AATHAVAN AALI........TYAVELI MALA TYANCHYA BHAVANA KADACHIT NAHI SAMAJALYA.......PAN AATA DOLYATUN APNI YET........

    उत्तर द्याहटवा
  7. aai mhanoni koni hi kavita maza 4th la hoti hi kavi ta jevha aamhi class madhe bolay cho tewha sarvhe class khup shant aasaycha it's my fevoret poem..........................

    उत्तर द्याहटवा
  8. aai mhanoni koni aais hak mari hi kavita kup kup sundar kavita aahe hi mala 4th class la ho ti ni aamhi sarve jan aavdi ne hi kavita eka surat mhanaycho..................

    उत्तर द्याहटवा
  9. excellent piece of information, I had come to know about your website from my friend kishore, pune,i have read atleast 8 posts of yours by now, and let me tell you, your site gives the best and the most interesting information. Marathi Kavita in Marathi Language This is just the kind of information that i had been looking for, i'm already your rss reader now and i would regularly watch out for the new posts, once again hats off to you! Thanx a lot once again, Regards, Marathi Poem Kavita Prem Girlfriend Romantic

    उत्तर द्याहटवा
  10. excellent piece of information, I had come to know about your website from my friend kishore, pune,i have read atleast 8 posts of yours by now, and let me tell you, your site gives the best and the most interesting information. Marathi Kavita in Marathi Language This is just the kind of information that i had been looking for, i'm already your rss reader now and i would regularly watch out for the new posts, once again hats off to you! Thanx a lot once again, Regards, Marathi Poem Kavita Prem Girlfriend Romantic

    उत्तर द्याहटवा
  11. I am a senior citizen of age 70. Even then this poem of Yashwant makes me cry. I strongly believe that a one without mother is poorer than beggar.

    उत्तर द्याहटवा
  12. Agadi lahan pani chya athvani tajya jhalya..
    aaila manavanya sathi sarvottam kavita ahe :)

    उत्तर द्याहटवा
  13. naad khula kavita aahe. khar mhanaje apanala aai gharat asate tevha tichi kimmat kalat nahi.ti gelyanantar matra jivanat ek pokali nirman hote ji kadhihi bharun yet nahi. tyamule aai-vadil ahet toparyant apan manapasun tyanchi seva keli pahije.

    उत्तर द्याहटवा
  14. Boss, film madhle gaane purna kavita samjane he agadi pahilya national award milalelya movie pasun chalu jahalay. He changla naho, purna kavita post kara plz

    उत्तर द्याहटवा
  15. दुसरी एक कविता मायतात ही आहे.ही जर कोणाला माहीत असेल तर लिहा.मि खूप दिवसापासून शोधत आहे.

    उत्तर द्याहटवा
  16. Hi Kavita Me first time vachli aprteem aahe. Kharach dolyat ashru aale majya. Aai chya hya don navat kiti godva aahe.Aayshybhar ti aplya balacha vichar karat aste. Tiche runa purna aayshyat apan phedu shakat nahi. I Love u Aai. Tujya vina he jag aadhura aahe.

    उत्तर द्याहटवा
  17. hi ka vita khup chan ahe ,aai tuza vina mi adurahe sagle Asel maza kade pun tu nashil tar tyachi kimat shune ahe

    उत्तर द्याहटवा
  18. ज्यांची आई जिवंत आहे,त्यांनी हि कविता वाचावी, त्यांना संधी आहे.
    असा कवी होणे नाही.👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  19. कविता वाचुन आई ची फार आठवण आली. मन गहिवरुन आल आणि डोळे पाणावले.

    उत्तर द्याहटवा
  20. कवि यशवंत ह्यांची आई हि कविता सर्वोत्कृष्ट रचना आहे.

    उत्तर द्याहटवा
  21. मला आठवते मी ३ री त तिसरीत होते ही कविता ४थी ला होती पण त्या वेळेस माझी आई घराातील कलहा मुळे ती काकी चया जागी माझा भावंडाना घेऊन तीला अचानक तालुकयात राहाव लागले आणि मी आजी सोबत गावातच राहत होते, आजी गेली तेंवा आमी ही कविता गायीली होती ती कविता आठवुन रोज रडायची ,तेथील लोकं मला चिडवायची ती माझी सावञ आई आहे.आणि तया वेळेस माझा बाल मनावर जे आघात झाले ते माझी ७वर्षा तेथेच आई चा तिरस्कार करनयात गेले ,जेंवा मला समजत होते कि तीच माझी आई आहे,तेंवा मी शिक्षणाा साठी तालुकया तुन बाहेर गेले आई ची नि माझी ताटातुट झाली मला तिची कमी खुप जानवायची तास न तास फोन बुथवर बोलत उभी राहायची.आजही तेच आहे मी फकत मोबाइल वर बोलु शकते भेंटू शकत नाही. आई...आजही ते गाणे ओठांवर येताच डोळयातुन आसु धारा वाहतात .मला २ आजी होते दूसरी गेली तेंवा बराच वर्षा ने समजल की ती पहीली आजी सावञ होती आणि तेंवा मला समजले आई चं प्रेम कधीच सख सावञ बघत नाही. तेंवापासुन मी आई ला सकारात्मक घेत होते आई माझीच असताना देखील मला तीचं प्रेम नाही भेंटल
    तुझी
    अरू

    उत्तर द्याहटवा
  22. मला आठवते मी ३ री त तिसरीत होते ही कविता ४थी ला होती पण त्या वेळेस माझी आई घराातील कलहा मुळे ती काकी चया जागी माझा भावंडाना घेऊन तीला अचानक तालुकयात राहाव लागले आणि मी आजी सोबत गावातच राहत होते, आजी गेली तेंवा आमी ही कविता गायीली होती ती कविता आठवुन रोज रडायची ,तेथील लोकं मला चिडवायची ती माझी सावञ आई आहे.आणि तया वेळेस माझा बाल मनावर जे आघात झाले ते माझी ७वर्षा तेथेच आई चा तिरस्कार करनयात गेले ,जेंवा मला समजत होते कि तीच माझी आई आहे,तेंवा मी शिक्षणाा साठी तालुकया तुन बाहेर गेले आई ची नि माझी ताटातुट झाली मला तिची कमी खुप जानवायची तास न तास फोन बुथवर बोलत उभी राहायची.आजही तेच आहे मी फकत मोबाइल वर बोलु शकते भेंटू शकत नाही. आई...आजही ते गाणे ओठांवर येताच डोळयातुन आसु धारा वाहतात .मला २ आजी होते दूसरी गेली तेंवा बराच वर्षा ने समजल की ती पहीली आजी सावञ होती आणि तेंवा मला समजले आई चं प्रेम कधीच सख सावञ बघत नाही. तेंवापासुन मी आई ला सकारात्मक घेत होते आई माझीच असताना देखील मला तीचं प्रेम नाही भेंटल
    तुझी
    अरू

    उत्तर द्याहटवा
  23. फार फार आभार.... पहिले तर ही कविता मजा हृदयचा फार जवळ आहे. मला ही कविता 4 थी मध्ये होती आणि मला याचा अर्थ समजत नसल्याने मला आई ने याचा अर्थ समजवला होता. ते समजावत असतांनाच आमचा दोघांचा पण डोळ्यात पानी भरून आलं होता आणि आम्ही एकमेकांना घट्ट धरून फार वेळ रडलो होतो.. त्यामुळे ही मजा मनाचा अगदी जवळ आहे.
    फार दिवसांपासन शोधत होतो आज सापडली.धन्यवाद जने कुणी ही पोस्ट केली ☺

    उत्तर द्याहटवा
  24. खरंच कविता वाचताना डोळ्यात पाणी आलं,माझी आई आहे तरीही मला इश्रू आवरता आले नाही ज्यांना आई नाही त्यांना काय वाटतं हे सांगणे कठीण

    उत्तर द्याहटवा
  25. खरंच कविता वाचताना डोळ्यात पाणी आलं,माझी आई आहे तरीही मला इश्रू आवरता आले नाही ज्यांना आई नाही त्यांना काय वाटतं हे सांगणे कठीण

    उत्तर द्याहटवा
  26. मी इयत्ता ७वी मध्ये असतांना मला ही कविता होती. ज्या वेळी मला माझ्या शिक्षकांनी हि कविता वर्गात शिकवलं तेव्हा आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं.... खरचं खूप छान कविता आहे ही, मला आत्ताही हि कविता खूप आवडते....

    उत्तर द्याहटवा
  27. Dattatraya Patane

    "aai mhanoni koni aais hak mari"
    hi kavita mi lahan asatana mala abhyasala hoti.hi majhi aawadati kavita aahe.syllabus change jhalyamule hi kavita mala baryach diwas prayatna karunahi sapadali nahi,pan aaj mala hi kavita bhetali'i am so happy.'it's my fevourit poem.

    उत्तर द्याहटवा
  28. माझ्या आवडत्या कविता मधील १ नंतर. कविता..... amazing ....

    उत्तर द्याहटवा
  29. कविता वाचून आईची फार आठवण आली.मन गहिवरुन आलं आणि डोळे पाणावले.

    उत्तर द्याहटवा
  30. ही कविता वाचून मला. माझ्या आईची
    फार आठवण येते.

    उत्तर द्याहटवा
  31. My heart teaching kavita class 4th
    and mi my class monitor .

    उत्तर द्याहटवा
  32. My heart teaching kavita class 4th
    and mi my class monitor .

    उत्तर द्याहटवा
  33. aai mhanoni koni aais hak mari"
    hi kavita mi lahan asatana mala abhyasala hoti.hi majhi aawadati kavita aahe.syllabus change jhalyamule hi kavita mala baryach diwas prayatna karunahi sapadali nahi,pan aaj mala hi kavita bhetali'i am so happy.'it's my fevourit poem from childhood....

    Thanks...

    उत्तर द्याहटवा
  34. आई ही संपूर्ण कविता वाचून खूप छान वाटलं.खरचं सुरेख शब्दरचना.या कवितेतील वात्सल्य हा एकच शब्द संवेदनशील मनाला पुरेसा आहे. Thank you.

    उत्तर द्याहटवा
  35. अतिशय मर्मस्पर्शी कविता वाचतांना नकळत डोळे भरुन आले.

    उत्तर द्याहटवा
  36. मनाच्या अगदी खोल रुतून बसलेली कविता. वेळ मिळाल्यावर संपूर्ण कविता ताल सुरात गात असतो.

    उत्तर द्याहटवा
  37. खुप सुंदर कविता आहे, आज मला लक्षात आलं, तर मी मोबाइल वर शोधला, आणि मी ती कविता म्हटले, माझे बालपणातले प्राथमिक शाळेतले ते दिवस आठवण झाले।।

    उत्तर द्याहटवा
  38. १५ ऑक्टोबर २०२० या काळ्या दिवशी माझी आई मला सोडून गेली आता मेल्यावर तरी मला स्वर्गात तरी भेटेल का ?वयाच्या ४८ व्या वर्षी च सोडून गेली कमीत कमी ६०वर्ष तरी जगायला पाहिजे होती ! जीवन मरण क्षणिक आहे ते आत्ता कळतंय आईला वेळ द्या आई सोबद जगा !

    उत्तर द्याहटवा
  39. दूर दूर वाटेवर , फिरून आता थकलोय
    आयुष्याच्या वळणावर जगाय ला विसरलोय
    काय कमवतोय ,काय शोधतोय ....
    जगाशी नातं तोडून नुसतं बरळतोय
    न कळत विचारांत , वाहून जातोय
    स्वतः लाच विसरून मृगजळात हरवतोय
    -सुरज काबुगडे @quotes_writerr/insta

    उत्तर द्याहटवा
  40. आज काम करत असताना बाहेर बाकड्यावर बसलेल्या वृध्द आईने, तिच्या मुलास "बाळा" अशी हाक मारली, क्षणार्धात माझ्याच आईने मला हाक मारली असे वाटले. माझा कंठ दाटून आला पण डोळ्यांच्या कडा पाणावल्या खऱ्या, पण कुणालाही कळू दिले नाही. गावाकडे असलेल्या आईची खूप खूप आठवण आली आणि लगेचच मला "आई म्हणुनी कोणी आईस हाक मारी" ही कविता आठवली, मात्र आईने "बाळ" अशी मारलेली हाक मला खूप काही सांगून गेली . ☺️

    उत्तर द्याहटवा
  41. या कवितेचे कवी - कवी यशवंत म्हणजे यशवंत दिनकर पेंढारकर.

    उत्तर द्याहटवा
  42. कवी यशवंत यांची 'आई'ही कविता मला चौथीच्या वर्गात होतीौ ़जेव्हा जेव्हा मला आईची आठवण येते तेव्हा तेव्हा मी ही कविता नेहमी गुणगुनतो ़

    उत्तर द्याहटवा
  43. आईची जाणिव करुन देणारी ही कविता सात जन्म जरी घेतले तरी लक्षात राहील.... आईची जागा या जगात कोणी ही घेऊ शकत नाही.... आईला दुखावू नका... तीला आनंदी ठेवा 😔

    उत्तर द्याहटवा
  44. या कवितेचे महावाक्य ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ अजरामर आहे.
    शंभर वर्षांपूर्वीची ही अवीट कविता आजही सर्व प्रिय आहे.
    ही कविता जर इतर कोणत्याही भाषेत असती तर लोकांनी असंख्य संदर्भांमध्ये दररोज कोट्यवधी वेळा या कवितेचा उद्धृत केला असता.
    मला खात्री आहे की एक दिवस या कवितेला पुन्हा एकदा योग्य मान्यतापात्र प्रशंसा आणि ओळख मिळेल.
    यशवंत दिनकर पेंढरकर ऊर्फ कवी यशवंत त्यांना 'महाराष्ट्रकवी' म्हणून गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानचे राजकवी होते. आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. "रविकिरण मंडळातील' सप्तर्षी मध्ये कवी यशवंत यांच्या नावांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जात असे.

    उत्तर द्याहटवा
  45. आज पाश्चात्य मातृ दिनी आईची व ह्या कवितेची भरभरून आठवण आली.

    उत्तर द्याहटवा
  46. हि कवीता ऐकताच माझ मन हिरावून जाते,म्हणून ही कविता मला वारंवार ऐकायला आवडते.

    उत्तर द्याहटवा