श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥
ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।
जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥
चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥
विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥
दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥
माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥
[’निर्वाणीचे गझल’ पैकी एक गझल. संदर्भ लोकसत्ता]
I keep visiting this blog from time to time. there has been no post since 26th Feb and I was a little disappointed to see the same post popping up on the home page. But noy today today. You had posted Vinda's poetry last time and I read it again today - just my little tribute to the great.
उत्तर द्याहटवादिरंगाईबद्दल क्षमस्व. सध्या मी कुठलेही काव्यसंग्रह हस्तगत करु शकत नसल्याने महाजालावरुन कविता शोधाव्या लागत आहेत. दै. लोकमतमध्ये आलेली एक कणिका आज सादर केली आहे..आणखीदेखिल काही मिळाल्या की लगेच उद्धृत करत जाईन.
उत्तर द्याहटवाकविता वाचलि आवडलि पण शेवट्च्या ओळि वेगल्या प्रकारात का? ते कळ्ले का?
उत्तर द्याहटवामकरंदजी, उसंडु. दुसरं काय?
उत्तर द्याहटवाउंची हा शब्द कोणत्या अर्थाने आला आहे
उत्तर द्याहटवाखूप छान कविता..
उत्तर द्याहटवा"उंची" म्हणजे समाजातले महत्त्व किंवा स्थान ह्या अर्थी तो शब्द वापरला आहे.
उत्तर द्याहटवा