नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;
नको नाचू तडातडा
असा कौलारावरून :
तांबे-सतेली-पातेली
आणू भांडी मी कोठून?
नको करू झोंबाझोंबी :
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;
आडदांडा नको येऊ
झेपावत दारातून :
माझे नेसूचे जुनेर
नको टाकू भिजवून;
किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना :
वाटेवरई माझा सखा
त्याला माघारी आण ना;
वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत;
विजेबाई, कडाडून
मागे फिरव पांथस्थ;
आणि पावसा, राजसा
नीट आण सांभाळून :
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;
पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;
नको घालू रे पावसा
असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाउपक्रमात सहभागी व्हायची इच्छा आहे. कुठे संपर्क करायचा?
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवाDo you also have MP3 song for नको नको रे पावसा - इंदिरा संत ?
If yes please send email to shree5rang@gmail.com
या कवितेचा अर्थ
उत्तर द्याहटवाYa kavitetil aashay sanga
उत्तर द्याहटवा