बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

आवाहन - दत्ता हलसगीकर

ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत
ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळपाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करुन भरुन घ्यावे
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना थोडे उचलून घ्यावे

७ टिप्पण्या:

  1. नितांत सुंदर कविता. ह्रदयाला हात घालणारी कविता

    उत्तर द्याहटवा
  2. मोजक्या शब्दात आयुष्य मांडलंय, खूप सुंदर

    उत्तर द्याहटवा
  3. ही कविता वरोर्याला बाबांच्या आनंदवनात गेलो होतो तेव्हा प्रथम वाचनात आली होती. नितांत सुंदर आणि अर्थपूर्ण कविता.

    उत्तर द्याहटवा