सोमवार, १४ मार्च, २०११

ह्या दु:खाच्या कढईची गा - बा.सी.मर्ढेकर

ह्या दु:खाच्या कढईची गा
अशीच देवा घडण असू दे;
जळून गेल्या लोखंडातहि
जळण्याची, पण पुन्हा ठसू दे
कणखर शक्ती, ताकद जळकट

मोलाची पण मलूल भक्ति
जशि कुंतीच्या लिहिली भाळी,
खिळे पाडुनि तिचे जरा ह्या
कढईच्या दे कुट्ट कपाळी
ठोकुनि पक्के, काळे, बळकट

फुटेल उकळी, जमेल फेस,
उडून जाइल जीवन-वाफ;
तरि सांध्यांतुन कढईच्या ह्या
फक्त बसावा थोडा कैफ
तव नामाचा भेसुर धुरकट.

३ टिप्पण्या:

  1. कॉलेज मध्ये शिकलेल्या या कवितेचा शोध घेताना आपला ब्लॉग सापडला. मराठी कवितेतील बोरकर, मर्ढेकर, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज आणि इतर थोर कवींच्या कविता रसिकांना उपलब्ध करून देण्याच्या आपल्या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा.
    आभारपूर्वक

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान व उपयुक्त उपक्रम आहे. आवडला. हल्ली ही काव्ये लुप्त झाली आहेत. अनंत अनंत शुभकामना।

    उत्तर द्याहटवा
  3. कवितेत कुंतीचं दुःख आणि भक्ती चा उल्लेख आहे याचं कुणी विश्लेषण करेल काय?

    उत्तर द्याहटवा