माझ्याजवळ,
माझ्या खिशात
नेहमी एक मोर असतो
पण माझ्या खिशातला हा मोर
साधासुधा मोर नाही.
कधीमधी उदासलं
किंवा मनावर काळे ढग दाटून आले
की हा शिकवलेला मोर
खिशातून आपोआप बाहेर येतो,
देहभर पिसारा फुलवतो अन नाचतो..
मनसोक्त...मनमुराद.
त्याला नाचताना पाहून
मुसळधार पाऊस पडतो,
उदास काळे ढग निघून जातात
अन माझं मन
पुन्हा शुभ्र होतं...निरभ्र होतं
एक गंमत सांगू?
असाच एक मनकवडा मोर
तुमच्याही खिशात आहे:
फक्त तुम्ही,
त्याला नाचणं शिकवायला हवं !
प्रशांत असनारे,
उत्तर द्याहटवाकवितेबद्द्ल खुप खुप अभिनंदन आणि क्षिप्रा कविता येथे प्रकाशित केल्या बद्दल तुमचे हि आभार.
मला हि या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल.
मी माझ्या कविता पाठवु शकतो का?
-अभि