सोमवार, १४ जानेवारी, २०१३

पाचोळा

आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवु द्या जगासी
सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी

११ टिप्पण्या:

  1. ही कविता मी नववीत असताना (1966-67) मराठी पाठ्यपुस्तकात होती.ही कविता कोणाची आहे कोणी सांगू शकेल काय? ही माझी आवडती कविता आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. ह्या गीताची पार्श्वभूमी ठाऊक आहे का? माझ्याकडे रेकॉर्ड आहे. मागच्या बाजूला कुसुमाग्रज यांची अनाम वीरा अश्या शिर्षकाची कविता आहे. 1964 साली म्हणजे चीन बरोबर च्या युद्धानंतर आलेली आहे. पाचोळा कवितेत वर्णन केलेला माळरानावर चा जीर्ण वृक्ष व खाली पडलेला पाचोळा हे कशाचे रुपक आहे? धन्यवाद. सुरेश Chandvankar Mumbai +919920813336

    उत्तर द्याहटवा
  3. ही gramophone रेकॉर्ड 1964 साली प्रकाशित झाली. तिच्या मागच्या बाजूस कुसुमाग्रज ह्यांची अनाम veera शीर्षकाची कविता आहे. 1962 Che युद्ध होऊन गेले होते. हे पूरक गीत असावे. मागच्या बाजूची पाचोळा कविता बरीच आधीची असावी. पाचोळा व विशाल तरू हे कशाचे रुपक असावे? सुरेश Chandvankar मुंबई

    उत्तर द्याहटवा
  4. विशाल तरु म्हणजे आपला भारत देश आणि पा चो ळा म्हणजे चिन हे मला वाटते

    उत्तर द्याहटवा
  5. ही कविता आम्हाला, मी नववीत असताना (सन १९६४-६५ न्यू इंग्लिश स्कूल, सातारा)) मराठी क्रमिक पुस्तकात अभ्यासाला होती. माझ्या माहितीनुसार 'पाचोळा' हे समाजातील असमानता सोसाव्या लागणाऱ्या वर्गाचे रुपक आहे.'आडवाटेला दूर एक माळ .. आणि त्याच्या बिलगोनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास' 'तरुवरची हसतात त्यास पाने, हंसे मुठभर ते गवत ही मजेने, वाटसरु वा तुडवीत त्यास जात परी पाचोळा दिसे नित्य शांत' 'आणि जागा हो मोकळी तळाशी ,पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी..' या ओळी ही वस्तुस्थिती ध्वनित करतात असे वाटते.

    अर्थात वेगवेगळ्या अभ्यासकांनी ज्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून या कवितेचे रसग्रहण केलेले आढळेल.

    शेवटचे शब्द तर 'आणि जागा हो मोकळी तळाशी ,पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी ' हे एक विदारक वास्तव आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. ही कविता आम्हाला, मी नववीत असताना ( सन १९६४-६५ साली - न्यू इंग्लिश स्कूल ,सातारा ) मराठी क्रमिक पुस्तकात अभ्यासाला होती. माझ्या माहितीनुसार 'पाचोळा' हे समाजातील असमानता सोसाव्या लागणाऱ्या वर्गाचे रुपक आहे.'आडवाटेला दूर एक माळ .. आणि त्याच्या बिलगोनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास' 'तरुवरची हसतात त्यास पाने, हंसे मुठभर ते गवत ही मजेने, वाटसरु वा तुडवीत त्यास जात परी पाचोळा दिसे नित्य शांत' 'आणि जागा हो मोकळी तळाशी ,पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी..' या ओळी ही वस्तुस्थिती ध्वनित करतात असे वाटते.

    अर्थात वेगवेगळ्या अभ्यासकांनी ज्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून या कवितेचे रसग्रहण केलेले आढळेल.

    शेवटचे शब्द तर 'आणि जागा हो मोकळी तळाशी ,पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी ' हे एक विदारक वास्तव आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. ही कविता आम्हाला, मी नववीत असताना ( सन १९६४-६५ साली - न्यू इंग्लिश स्कूल ,सातारा ) मराठी क्रमिक पुस्तकात अभ्यासाला होती. माझ्या माहितीनुसार 'पाचोळा' हे समाजातील असमानता सोसाव्या लागणाऱ्या वर्गाचे रुपक आहे.'आडवाटेला दूर एक माळ .. आणि त्याच्या बिलगोनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास' 'तरुवरची हसतात त्यास पाने, हंसे मुठभर ते गवत ही मजेने, वाटसरु वा तुडवीत त्यास जात परी पाचोळा दिसे नित्य शांत' 'आणि जागा हो मोकळी तळाशी ,पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी..' या ओळी ही वस्तुस्थिती ध्वनित करतात असे वाटते.

    अर्थात वेगवेगळ्या अभ्यासकांनी ज्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून या कवितेचे रसग्रहण केलेले आढळेल.

    शेवटचे शब्द तर 'आणि जागा हो मोकळी तळाशी ,पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी ' हे एक विदारक वास्तव आहे.

    उत्तर द्याहटवा
  8. ही कविता आम्हाला, मी नववीत असताना ( सन १९६४-६५ साली - न्यू इंग्लिश स्कूल ,सातारा ) मराठी क्रमिक पुस्तकात अभ्यासाला होती. माझ्या माहितीनुसार 'पाचोळा' हे समाजातील असमानता सोसाव्या लागणाऱ्या वर्गाचे रुपक आहे.'आडवाटेला दूर एक माळ .. आणि त्याच्या बिलगोनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास' 'तरुवरची हसतात त्यास पाने, हंसे मुठभर ते गवत ही मजेने, वाटसरु वा तुडवीत त्यास जात परी पाचोळा दिसे नित्य शांत' 'आणि जागा हो मोकळी तळाशी ,पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी..' या ओळी ही वस्तुस्थिती ध्वनित करतात असे वाटते.

    अर्थात वेगवेगळ्या अभ्यासकांनी ज्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून या कवितेचे रसग्रहण केलेले आढळेल.

    शेवटचे शब्द तर 'आणि जागा हो मोकळी तळाशी ,पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी ' हे एक विदारक वास्तव आहे.

    उत्तर द्याहटवा