बुधवार, १४ मार्च, २००७

पक्षांचे थवे - ना. धों. महानोर

विस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट
बावरा पक्षी

पाण्यात एक सावली, हले बाहुली
थरकते ऊन
ही माल्हन म्हणते गान, चंद्र माळून
बहकते रान

झाडीत हूल बिथरते, गंध विखरते
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सन्नाट
बावरा पक्षी

३ टिप्पण्या:

  1. ह्या गाण्याची mp3 मिळेल का ? मी कॉलेजला असताना हा अलबम आला होता. माझ्या कडे कॅसेट होती. पण ती कॅसेट कुठं हरवली कळलेच नाही. मी खुप शोध घेतला इंटरनेट वर पण कुठेच नाहीत ही गाणी.

    उत्तर द्याहटवा