रविवार, २२ एप्रिल, २००७

कोऱ्या कोऱ्या कागदा वर - मंगेश पाडगांवकर

कोऱ्या कोऱ्या कागदा वर

कोऱ्या कोऱ्या कागदा वर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

ती मनात झुरते आहे
तुम्ही पहात राहणार
कल्पनेच्या पावसात
नुसतं नहात राहणार
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
घट्ट जवळ घेतल्याशीवाय
माणुस नसतं आपलं
कोऱ्या कोऱ्या कागदा वर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

शब्द शब्द रीते शब्द
त्यांचं काय करणार?
तळ फुटक्या माठामधे
पाणी कसं भरणार?
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
आपण ओठ लावल्याखेरीज
पाणी नसतं आपलं
कोऱ्या कोऱ्या कागदा वर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

करुन करुन हीशेब धुर्त
खुप कहि मिळेल
पण फुल का फुलतं
हे कसं कळेल
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
फुलपाखरु बनल्याखेरीज
फुल नसतं आपलं
कोऱ्या कोऱ्या कागदा वर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

मातीमधे बीजाला
एकचं अर्थ कळतो
कोंब फुटुन आल्यावर
हीरवा मोक्ष मीळतो
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
आतुन आतुन भीजल्याखेरीज
रुजणं नसतं आपलं
कोऱ्या कोऱ्या कागदा वर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

1 टिप्पणी: