ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची
दूर ती गेली तरीही सावली भेटायची
त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी
हात देताना तिला माझीच फांदी व्हायची
पावसाला पेच होता ह्या सरी वळवू कुठे
चिंबताना त्या पुलाखाली ती नदी थांबायची
वर निळी कौले नभाची डोंगराची भिंत ती
ते नदीकाठी भटकणे हीच शाळा व्हायची
जीर्ण ह्या पत्रातुनी मी चाळतो मजला असे
ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची
गवतही भोळे असे की साप खेळू द्यायचे
सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची
फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची
फारच छान!
उत्तर द्याहटवाmasta kavitaa
उत्तर द्याहटवा-visunana
सदर कवितेमधील काही रचना
उत्तर द्याहटवा"वागणे होते असे की कागदी नावा जश्या
मग अंगणातून धावताना काच हि मउ व्हायची"
ते दिवस ........
"कैक वाटा चाललो पण विसरलो पोह्चायचे
मग नेमक्या वळनातुनी पाऊले परतायची"
ते दिवस ........
फारच सुंदर कविता
खूप सुंदर कविता
उत्तर द्याहटवासदर कवितेमधील काही रचना
उत्तर द्याहटवा"वागणे होते असे की कागदी नावा जश्या
मग अंगणातून धावताना काच हि मउ व्हायची"
ते दिवस ........
"कैक वाटा चाललो पण विसरलो पोह्चायचे
मग नेमक्या वळनातुनी पाऊले परतायची"
ते दिवस ........
फारच सुंदर कविता
सदर कवितेमधील काही रचना
उत्तर द्याहटवा"वागणे होते असे की कागदी नावा जश्या
मग अंगणातून धावताना काच हि मउ व्हायची"
ते दिवस ........
"कैक वाटा चाललो पण विसरलो पोह्चायचे
मग नेमक्या वळनातुनी पाऊले परतायची"
ते दिवस ........
फारच सुंदर कविता
खूप छान मी किन्हवली येथे एका कार्यक्रमात ऐकली होती
उत्तर द्याहटवाही कविता सुरेश भट ह्यांनी लिहली आहे...
उत्तर द्याहटवा