गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

ते दिवस आता कुठे - अरुण म्हात्रे

ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची
दूर ती गेली तरीही सावली भेटायची
त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी
हात देताना तिला माझीच फांदी व्हायची
पावसाला पेच होता ह्या सरी वळवू कुठे
चिंबताना त्या पुलाखाली ती नदी थांबायची
वर निळी कौले नभाची डोंगराची भिंत ती
ते नदीकाठी भटकणे हीच शाळा व्हायची
जीर्ण ह्या पत्रातुनी मी चाळतो मजला असे
ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची
गवतही भोळे असे की साप खेळू द्यायचे
सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची
फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची

११ टिप्पण्या:

Dhananjay म्हणाले...

फारच छान!

VijayN म्हणाले...

masta kavitaa
-visunana

Unknown म्हणाले...

सदर कवितेमधील काही रचना
"वागणे होते असे की कागदी नावा जश्या
मग अंगणातून धावताना काच हि मउ व्हायची"
ते दिवस ........
"कैक वाटा चाललो पण विसरलो पोह्चायचे
मग नेमक्या वळनातुनी पाऊले परतायची"
ते दिवस ........

फारच सुंदर कविता

Unknown म्हणाले...

खूप सुंदर कविता

Unknown म्हणाले...

सदर कवितेमधील काही रचना
"वागणे होते असे की कागदी नावा जश्या
मग अंगणातून धावताना काच हि मउ व्हायची"
ते दिवस ........
"कैक वाटा चाललो पण विसरलो पोह्चायचे
मग नेमक्या वळनातुनी पाऊले परतायची"
ते दिवस ........

फारच सुंदर कविता

Unknown म्हणाले...

सदर कवितेमधील काही रचना
"वागणे होते असे की कागदी नावा जश्या
मग अंगणातून धावताना काच हि मउ व्हायची"
ते दिवस ........
"कैक वाटा चाललो पण विसरलो पोह्चायचे
मग नेमक्या वळनातुनी पाऊले परतायची"
ते दिवस ........

फारच सुंदर कविता

हिरामन देसले म्हणाले...

खूप छान मी किन्हवली येथे एका कार्यक्रमात ऐकली होती

Akshay Samel म्हणाले...

ही कविता सुरेश भट ह्यांनी लिहली आहे...

लालसिंग सुमन महिपत वैराट म्हणाले...

अप्रतिम

लालसिंग सुमन महिपत वैराट म्हणाले...

जेष्ठ कवी अरुण म्हात्रे

Vijaykumar Rajaram Desale म्हणाले...

सर,
खूपच छान रचना आहे.


किन्हवली व शहापूर येथील कार्यक्रमात आपल्या या अप्रतिम रचनेचा आस्वाद घेता आला होता......