(काही सुधारणा असल्यास कृपया सुचवावी)
ये ये ताई पहा पहा, गम्मत नामी किती अहा
ये ये ताई पहा पहा, गम्मत नामी किती अहा
चांदोबा खाली आला, हौदामध्ये बघ बुडला
कसा उतरला, किंवा पडला, पाय घसरला
कशास उलटे चालावे, पाय नभाला लावावे.
किती उंच ते आभाळ, तेथुनी हौद किती खोल
तरी हा ताई, "आई आई", बोलत नाही
चांदोबा तू रडू नको, ताई तू मज हसू नको
किती किती हे रडलास, हौद रड्याने भरलास
तोन्ड मळविले, अंग ठेचले, तेज पळाले
उलटा चालू नको कधी, असाच पडशील जलामधी!