बसलेले: संजीवनी मराठे, पद्मा गोळे, कवि यशवंत, बा.भ.बोरकर, वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) ऊभे: मंगेश पाडगाँवकर, वसंत बापट, ग.दी.माडगुळकर, वा.रा.कांत |
मंगळवार, १४ जानेवारी, २०२०
सोमवार, १३ जानेवारी, २०२०
सांध्यसुंदरी
इंद्रनील चंद्रकांत सांध्यसुंदरी ही
येइ हसत मधुर मंद विश्वामंदिरीं ही .....
उंबर्यांत धुउनि उन्हे धूळ माणकांची
मूर्ति सजल-पारिजात-कांत पावलांची
नेसुनि ये वसन नरम तलम अंजिरी ही ....
मंदानिल दुडदुडुनी बिलगले पदांला
उचलुनि त्यां मृदुल करें लाविलें उराला
चुंबुनि त्यां मोहरली स्नेहमंजिरी ही ....
कुरवाळुनि बोलवि ही बोबडया खगांना
लावुनि गालांस बोट खुलवि वल्लरींना
एक एक नवलदिवा लावि अंबरीं ही ....
पिककंठी जलवंती उघडुनी उराला
दावि इंद्रचापवर्णचित्ररत्नमाला
कुजबुजली गुज तिजशीं स्वर्गमाधुरी ही ....
झाले छायार्द्र नेत्र भूमिमाउलीचे
वात्सल्ये जड झाले पयद माउलींचे
स्वागद हें भावोत्कट बघुनि बावरी ही .....
व्यथित मना ... कर जोडुनि स्मर ‘शुभं करोति’
स्थिरचर एकाग्रचित्त जाहलें सभोतीं
वाहाया तुजवर ये शांतिनिर्झरी ही
येइ हसत मधुर मंद विश्वामंदिरीं ही .....
उंबर्यांत धुउनि उन्हे धूळ माणकांची
मूर्ति सजल-पारिजात-कांत पावलांची
नेसुनि ये वसन नरम तलम अंजिरी ही ....
मंदानिल दुडदुडुनी बिलगले पदांला
उचलुनि त्यां मृदुल करें लाविलें उराला
चुंबुनि त्यां मोहरली स्नेहमंजिरी ही ....
कुरवाळुनि बोलवि ही बोबडया खगांना
लावुनि गालांस बोट खुलवि वल्लरींना
एक एक नवलदिवा लावि अंबरीं ही ....
पिककंठी जलवंती उघडुनी उराला
दावि इंद्रचापवर्णचित्ररत्नमाला
कुजबुजली गुज तिजशीं स्वर्गमाधुरी ही ....
झाले छायार्द्र नेत्र भूमिमाउलीचे
वात्सल्ये जड झाले पयद माउलींचे
स्वागद हें भावोत्कट बघुनि बावरी ही .....
व्यथित मना ... कर जोडुनि स्मर ‘शुभं करोति’
स्थिरचर एकाग्रचित्त जाहलें सभोतीं
वाहाया तुजवर ये शांतिनिर्झरी ही
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)