आपणच आपल्याला लिहीलेली
पत्र वाचता वाचता
ओले होणारे डोळे पुसून
फडफडू द्यावीत वा-यावर पानं
थोडंसं हसून आपणच आपल्याला
सांगावी कधी तरी एखादी गोष्ट
आपणच गावं आपल्यासाठी
रिमझिमत्या स्वराचं एखादं गाणं
आपणच जपावेत मनात
वा-यावर झुलणारे गवताचे तुरे
एखादी दूरात धावणारी पायवाट
जपावेत काही नसलेले भास
जिथे आपल्यासाठी फुलं उमलतील
अशी जागा सगळ्यांनाच सापडत नाही
मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना
आपणच द्यावेत थोडेसे श्वास
फारच सुंदर कविता👌
उत्तर द्याहटवामाझी आवडती कविता...
उत्तर द्याहटवाखुप छान👏✊👍 आहे कविता
उत्तर द्याहटवा