श्रावणातले ऊन रेशमी
आकाशाला बांधून ठेवी
घट्ट धरेशी
सह्याद्रीच्या गळ्यात पडती
श्रावणतल्या सरी सराईत
ओलेत्याने
आणि ओणव्या माळालाही
हंबरणारा अवखळ वारा
ढुशी मारतो भलत्या जागी
अडचणीतल्या पाऊलवाटा
अंग चोरुनी हळूच पळती
माझ्या जवळून
मजला टाळून
- ब्रम्ह जाहले धरणीला वश
अशा प्रसंगी
आत कुठेसे
मला टोचते मातीचे यश
Nice! Thanks Kshipra!
उत्तर द्याहटवाशांता शेळके यांच्या बरसात आणि सहजखूण साठी माझ्याकडून धन्यवाद
उत्तर द्याहटवासध्या जरा हाताशी वेळ आहे त्यामुळे आवडत्या कवितांसाठी वेळ मिळतो आहे.
उत्तर द्याहटवाUr taste of poems is also very good.
उत्तर द्याहटवाकवितांची निवड फार चांगली आहे
उत्तर द्याहटवा