मिळणार तशी न शोधूनी दुसऱ्या लाख
किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले
हासती केसही सुंदर काळे कुरळे
अंगात शोभला झगा रेशमी लाल
केसांवर फुलले लाल फितीचे फूल
कितीतरी बाहुल्या होत्या माझ्या जवळी
पण तीच सोनुली फार मला आवडती
मी तिजसह गेले माळावर खेळाया
मी लपुनी म्हटले साई-सूट्यो या या
किती शोध-शोधली परी न कोठे दिसली
परतले घरी मी होऊन हिरमुसलेली
वाटते सारखे जावे त्याच ठिकाणी
शोधूनी पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी
जाणार कशी पण पाऊस संततधार
खल मुळी न तिजला वर झोंबे फार
पाऊस उघडता गेले माळावरती
गवतावर ओल्या मजला सापडली ती
कुणी गेली होती गाय तुडवूनी तिजला
पाहुनी दशा ती रडूच आले मजला
मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान
केसांच्या झिपऱ्या रंगही गेला उडून
पण आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली माझी माझी म्हणुनी
omg...thank u so much...so much i was searching for this...ai lahan pani mhanyachi ...ani ata mala mazya mulisathi mhanaychi aahe
उत्तर द्याहटवाचौथीचा वर्ग. शाळा नुकतीच सुरू झालेली. अजून या वर्गावर आलेल्या नव्या सरांची फारशी ओळख नाही. एका दिवशी सरांनी वर्गात येऊन एकेका मुलाला / मुलीला काल शिकवलेली कविता म्हणून दाखवायला सांगितली. पूर्ण वर्गात कुणाचीच पाठ नाही कविता.
उत्तर द्याहटवा"यापुढे कविता शिकवली की दुसर्या दिवशी पाठ पाहिजे." सरांनी जाहीर केलं. नाईलाजाने, मार चुकवण्यासाठी पोरं कविता पाठ करायला लागली. चौथीचं वर्ष संपलं, पण कविता पाठ करण्याची सवय कायमची राहिली. नाईलाजाची जागा आवडीने कधी घेतली समजलंच नाही. तर कविता पाठ करण्याची सुरुवात झाली ती या कवितेपासून. :)
aapaN khup sundar sangraha kelaa aahe. malaa vatate "Laadaki baahuli" yaa kavitet 'swapnaat tine roj ekadaa yaave...... ashaa kaahi oLi missing aahet.
उत्तर द्याहटवाही कविता अाईच्या शालेय जीवनातील!आईच्या अतिशय आवडीची!माझ्या बालपणी ती अगदी छान चालीत म्हणून दाखवायची! तिच्याकडून मला ऐकायला मिळाली....माझीही पाठ आहे!
हटवा"स्वप्नात तिने मम रोज एकदा यावे, हलवूनी मलाही माळा वरती न्यावे!
पाऊस उघडता....."
Chhan kavita ahe. Ti shevtchi ol khupch sundar.
उत्तर द्याहटवासुन्दर
उत्तर द्याहटवाबाहुली ....आपली मुलगी आठवण येते
अतिशय सुरेख कविता, ह्दयातली ठेवच जशी...
उत्तर द्याहटवाखूप।छान संदेश आहे
उत्तर द्याहटवाचार ओळी missing आहेत कवयित्री बहुधा इंदिरा संत आहेत
उत्तर द्याहटवाहासती केस.....नंतर च्या २ओळी
उत्तर द्याहटवाझाकती ऊघडती निळे सासरे डोळे
अन् ओठ जसे की आताच खुदकन हसले.
परतले घरी.....नंतर चर्या २ओळी खालील प्रमाणे आहेत
स्वप्नात तिने मम रोज एकदा यावे,
हलवून हळू मज माळावर ती न्यावे.
ही कविता आमच्या लहान वयात आमच्या सर्व बहिणी आणि वर्गमैत्रिणींची आवडती कविता होती. पण ही कविता म्हणत असतांना सर्वांच्या डोळ्यात पाणी येत असे.
उत्तर द्याहटवाशांता शेळके यांच्या कवाता ह्या त्या वयातच नव्हे तर आजही ताज्या रसरशित वाटतात.
अगदी सहजसुंदर गोड भाषा हे शांता शेळके या कवयित्रीने वैशिष्ट्य.
Maazi faaarach aavadati kavita.kahi oli missing aahet. Kavyitri Indira Sant ch asavyat. Kunakade purn kavita asel tar jarur pathavavi.
उत्तर द्याहटवाखरोखरच शाळेत असल्यापासून ते आजही हि कविता मन मोहून टाकते.आज पुन्हा एकदा मला माझं बालपण आठवलं आणि जणू काही त्या काळात गेल्याचा भास होतो. खरचं छान.
उत्तर द्याहटवामन व्याकुळ होतं
उत्तर द्याहटवा