शुक्रवार, २० जून, २००८

या बाळांनो, या रे या ! - भा. रा. तांबे

या बाळांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !

मजा करा रे मजा करा !
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे तोचि फसे;
नवभूमी दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया !

खळखळ मंजुळ गाति झरे,
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुले फळे,
सुवास पसरे, रसहि गळे.
पर ज्यांचे सोन्याचे
ते रावे, हेरावे.
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया

२ टिप्पण्या:

. म्हणाले...

मित्रा, तुला माहित नाही, तू किती छान काम करतो आहेस‌! आम्हाला तुझा हा प्रयत्न खरोखर खूपच आवडला. तुला धन्यवाद द्यावेत तितके कमीच आहेत. कृपया, आता थांबू नका! लिहिते रहा...

. म्हणाले...

मराठी किती स‌ुंदर आहे, याची मलमली जाणीव हे असं काही वाचलं, की स‌ारखी होत राहते..
पुन्हा एकदा धन्यवाद!
आपला,
विसोबा खेचर.