गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९

माझे जगणे होते गाणे - कुसुमाग्रज,

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामाधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे

४ टिप्पण्या:

anup kulkarni म्हणाले...

i think there is one more stanza in this poem

Padmakar (पद्माकर) म्हणाले...

श्री. अनुप कुलकर्णी, आपल्या शऱ्याबद्दल धन्यवाद. आपल्याल जर ते कडवं आठवत असेल, तर जरूर कळवा. मी ते ताबडतोब समाविष्ट करेन.

Dhananjay म्हणाले...

Padmakar,
I will like contributing too. Though I can't be very frequent, I can contribute.

Dhananjay म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.