बुधवार, ७ जुलै, २०१०

माय - स.ग. पाचपोळ

[फॉरवर्डस मधून आलेल्या एका ईमेलमध्ये खालील कविता मिळाली. मूळ फॉरवर्डमध्ये नारायण सुर्वे कवी असल्याचा उल्लेख केला गेला होता. पण प्रणव प्रियांका प्रकाशा ह्या तरुण, जाणकार कवींनी सुचवलेल्या दुरुस्तीनुसार स.ग.पाचपोळ हे मूळ कवी आहेत. त्याप्रमाणे बदल करत आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की जितेंद्र जोशी ह्यांनी देखिल एका कार्यक्रमात ही कविता सादर करताना मराठी कवीचा उल्लेख "नारायण सुर्वे" असाच केला आहे.]

हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय

आयाबाया सांगत व्हत्या व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून पाजत जाय
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय

कन्या-काट्या येचायाला माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं नसे पाय
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय

बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता घेऊ दे हाती काम
शिकुनश्यानं कुठं मोठ्ठा मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी दिसतो माझी माय

दारु पिऊन मायेले मारी जवा माझा बाप
थरथर कापे आन लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय

बोलता बोलता येकदा तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील दुधावरची साय
तवा मले सायीमंदी दिसती माझी माय

म्हनून म्हंतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी दिसती माझी माय‍

७ टिप्पण्या:

प्रणव प्रि. प्र. म्हणाले...

ही कविता नारायण सुर्वेंची नसून ती स. ग. पाचपोळ या मराठवाड्यातल्या कवीची आहेत. ते आता हयात नाहीत.
कवी प्रा. प्रशांत मोरे त्यांच्या माय अर्थात आईच्या कविता हा कार्यक्रम सादर करताना ही कविता सादर करतात. मी त्यांच्यासोबत बरेच कार्यक्र केले आहेत. कृपया पाचपोळांचा उल्लेख करावा ही विनंती.

Padmakar (पद्माकर) म्हणाले...

प्रणव प्रि. प्र - दुरुस्ती सुचवल्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार. ईंटरनेटच्या माध्यमामूळे बरच ज्ञानग्रहण होतं हे खरं पण कित्येकदा चुकीची माहितीदेखिल पसरवली जाते.

ह्या कवितेतील पहिले २ शब्द वापरून गुगलशोध केला तेव्हा पहिल्या काही शोधनिकालांमध्ये कवीचा उल्लेख नारायण सुर्वे असाच केला गेला होता.

प्रणव प्रि. प्र. म्हणाले...

धन्यवाद पद्माकर.
नारायण सुर्वे यांच्या नावाने अशा ब-याच कविता सांगितल्या जातात.असो.
आपले आभार.
पाचपोळांसारखा दुर्लक्षित कवी लोकांना कळेल या माध्यमातून.
पुन्हा आभार.

Sameer Samant म्हणाले...

"दीप लाव तो...."
प्रसन्न झाला देव मानवा ..... हि कविता कोणाची आहे महित आहे का कोणाला ..?

Padmakar (पद्माकर) म्हणाले...

समीरजी, कविता कोणाची आहे माहित नाही पण लोकसत्तेत सापडली. पोस्ट केली आहे. धन्यवाद.

Jitendra म्हणाले...

Will any one tell me from where I can download the above poem in mp3 format....Disti Maazi Maay

archana rao म्हणाले...

येणार्याला पाणी द्यावे मुखात वाणी गोड हवी,
जाणार्याच्या मनात फिरुनी येण्याविषयी ओढ हवी,
ऎसा माणूसचा झरा असावा मनामध्ये
भांनड्याला लागतेच भांनडे विसरुनी जावे क्षणामामधे
नित्यकाळजि घरात घ्यावि पिकलेल्या पानांची ज्याचि त्याला द्यावि जागा वयाप्रमाणे मानाची
ओळख कोणत्या कवितेतील आहेत