जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंड्या जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.
दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मजा म्हणून सांगू
शब्दासाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.
एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.
त्याच रात्री आम्ही पांचानी
एकमेकास बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आई देखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.
सोमवार, २ ऑगस्ट, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
१० टिप्पण्या:
mazi aae
खूप छान लेख आवडला सुर्वे सर हे एक प्रत्यक्ष देवाने पाठविलेले देवदूतच होते. अन्यथा समाजात अशा प्रकारची वैचारिक.भावनिक आणि सामाजिक क्रांती घडवणे सोपी गोष्ट नाही अशा या लोकभिमुख महाकवीला माझा सलाम .......................
छान
खूप मस्त कविता आहे ही. मला फार आवडली.
खूप छान कविता आहे.
Very emotional I like most.....😢😢😢
sir mala khup aavadli kavita. Mazhya aaichi athvan aali.
ही कविता वाचत असताना डोळे पाणावल्याशिवाय राहिले नाही...खरोखर अतिशय ह्रिदयस्पर्षी लेखन....!!👌😢
😢😢😢😢
नारायण सुर्वे यांची कविता थेट ह्रदयाशी संवाद साधते.
टिप्पणी पोस्ट करा