सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

लाडकी बाहुली - शांता शेळके

लाडकी बाहुली होती माझी एक

मिळणार तशी न शोधूनी दुसऱ्या लाख
किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले
हासती केसही सुंदर काळे कुरळे
अंगात शोभला झगा रेशमी लाल
केसांवर फुलले लाल फितीचे फूल
कितीतरी बाहुल्या होत्या माझ्या जवळी
पण तीच सोनुली फार मला आवडती
मी तिजसह गेले माळावर खेळाया
मी लपुनी म्हटले साई-सूट्यो या या
किती शोध-शोधली परी न कोठे दिसली
परतले घरी मी होऊन हिरमुसलेली
वाटते सारखे जावे त्याच  ठिकाणी
शोधूनी पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी
जाणार कशी पण पाऊस संततधार
खल मुळी न तिजला वर झोंबे फार
पाऊस उघडता गेले माळावरती
गवतावर ओल्या मजला सापडली ती
कुणी गेली होती गाय तुडवूनी तिजला
पाहुनी  दशा ती रडूच आले मजला
मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान
केसांच्या झिपऱ्या रंगही गेला उडून
पण आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली माझी माझी म्हणुनी

३ टिप्पण्या:

arti म्हणाले...

omg...thank u so much...so much i was searching for this...ai lahan pani mhanyachi ...ani ata mala mazya mulisathi mhanaychi aahe

Gouri म्हणाले...

चौथीचा वर्ग. शाळा नुकतीच सुरू झालेली. अजून या वर्गावर आलेल्या नव्या सरांची फारशी ओळख नाही. एका दिवशी सरांनी वर्गात येऊन एकेका मुलाला / मुलीला काल शिकवलेली कविता म्हणून दाखवायला सांगितली. पूर्ण वर्गात कुणाचीच पाठ नाही कविता.
"यापुढे कविता शिकवली की दुसर्‍या दिवशी पाठ पाहिजे." सरांनी जाहीर केलं. नाईलाजाने, मार चुकवण्यासाठी पोरं कविता पाठ करायला लागली. चौथीचं वर्ष संपलं, पण कविता पाठ करण्याची सवय कायमची राहिली. नाईलाजाची जागा आवडीने कधी घेतली समजलंच नाही. तर कविता पाठ करण्याची सुरुवात झाली ती या कवितेपासून. :)

Suresh - सुरेश शिरोडकर म्हणाले...

aapaN khup sundar sangraha kelaa aahe. malaa vatate "Laadaki baahuli" yaa kavitet 'swapnaat tine roj ekadaa yaave...... ashaa kaahi oLi missing aahet.