सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

जोगीण - कुसुमाग्रज

साद घालशील
तेव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन

दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावलीसारखी
निघून जाईन.

तुझा मुगुट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही

माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन.

1 टिप्पणी:

व्यंकटेश चौधरी म्हणाले...

निरपेक्षतेची परमोच्च अभिव्यक्ती...