सोमवार, १८ डिसेंबर, २००६

कणा - कुसुमाग्रज

कणा

‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!

३४ टिप्पण्या:

GM FOUNDATION म्हणाले...

निःशब्द झालो... ग्रेट.

Santosh Jadhav म्हणाले...

सुंदर रचना

ABHAY म्हणाले...

खूपच प्रेरणादायी कविता आहे

ABHAY म्हणाले...

खूपच प्रेरणादायी कविता आहे

sgr म्हणाले...

nice

Unknown म्हणाले...

या कवितेचे रसग्रहण ???

विजय चिकणे म्हणाले...

खुप छान कविता आहे शालेय जिवनापासून माझी पाठ आहे.

विजय चिकणे म्हणाले...

खुप छान

संस्कार म्हणाले...

अप्रतिम कविता आहेत.निरोप समारंभ मध्ये विद्यार्थ्यांसाठी नेहमी मी म्हणत असतो. आणि शेवटी विद्यार्थ्यांना आपला कणा कसा ताट ठेवायचा याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे कणा कविता.सलाम पुन्हा एकदा कुसुमाग्रजांना.

Unknown म्हणाले...

खूप छान

Unknown म्हणाले...

खूप छान

Govind puri म्हणाले...

खूप सुंदर कविता आहे .

Govind puri म्हणाले...

खूप सुंदर कविता आहे .

Unknown म्हणाले...

कुसुमाग्रज.. . Hats off to u

Unknown म्हणाले...

खूप सुंदर कविता .......

Abhijeet Bhatale म्हणाले...

मी खूप वेळा पाहतोय ही कविता खूप मस्त आणि मला खूप आवडते

Unknown म्हणाले...

खूप सुंदर कविता

Unknown म्हणाले...

अप्रतिम लेख... निःशब्द

Pravin Shringarpure म्हणाले...

प्रेरणादायी कविता.

Unknown म्हणाले...

Mazi sarvat avdti Kavita

Unknown म्हणाले...

खूप सुंदर कविता आहे .

Unknown म्हणाले...

खूप सुंदर कविता आहे .

श्री आप्पासाहेब गवारे पाटील म्हणाले...

आयुष्याच्या दुःख दायी वळणावर्ती सुद्धा कणा ताठ ठेवण्याचे धाडस प्राप्त होते

खरचं खूपच प्रेरणा देते ,,,,

मला शाळेत असताना तिचा अर्थ समजत नव्हता पण आता मात्र तो नक्कीच कळतो , कारण आता स्वतः आयुष्य अनुभवतोय,,,,,

श्री आप्पासाहेब गवारे पाटील म्हणाले...

खूपच सुंदर
थोड्या शब्दात खुप काही सांगून जाते ही कविता

Unknown म्हणाले...

अप्रतिम कविता आहे .कवी कुसुमग्रज यांनी अतिशय आशयपूर्ण शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.प्रत्येक व्यक्तीला जीवनात काही ना काही दुःख असते अशा प्रसंगात ही कविता प्रेरणादायी वाटते .

Pratap Patil म्हणाले...

अप्रतिम शिक्षण व शिक्षक यांना समर्पित

Sandip Dhawas म्हणाले...

मनाला स्पर्श करणारी शब्द रचना

Unknown म्हणाले...

Khup sundar

Unknown म्हणाले...

खुपच छान आहे एकदम भाऊक

Unknown म्हणाले...

अप्रतिम कविता

Rakesh Khanderao Pathade म्हणाले...

अचानक मुलगा गेला.पण ही कविता आठवली आणि परत आत्मिक हिंमत मिळाली.आजच्या आधुनिक काळात अश्या कवितांची शिकवण मुलांना मिळाली पाहिजे.

Unknown म्हणाले...

कविता खूप छान आहे मी माझ्या स्कूल मध्ये कविता म्हटली आणि मला याच्या मध्ये एक नंबर चे बक्षीस मिळाले.

Unknown म्हणाले...

🙏खूपच प्रेरणादायी कविता🙏

Unknown म्हणाले...

Kana jivanachi uddishata sangatat.kana swapnatal awismarniy swapna..