मंगळवार, २० फेब्रुवारी, २००७

या झोपडीत माझ्या - संत तुकडोजी महाराज

या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥

२८ टिप्पण्या:

BHALCHANDRA म्हणाले...

शाळेचे दिवस आठवले, जून्या आठवणीं प्रत्यक्ष झाल्या...

का.ना.देशमुख म्हणाले...

पुन्हा पुन्हा ऐकावी अशी कविता.

का.ना.देशमुख म्हणाले...

पुन्हा पुन्हा तालसुरात ऐकावी वाटणारी कविता!!

Unknown म्हणाले...

गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी

Unknown म्हणाले...

असे वाटते कि पुन्हा तो दिवस यावा आणि पुन्हा ती शाळा असावी पण ती कधीच बंद नसावी.

Unknown म्हणाले...

The words ring so true. Very profound.memories of carefree happy days

दयानंदाच्या नोंदी... म्हणाले...

All Time Fav

अनामित म्हणाले...

Happiness is here

Unknown म्हणाले...

hi kavita khup changli ahe

Unknown म्हणाले...

Chan kavita

Unknown म्हणाले...

साधे राहणीमान या विषयावर तुमचे मत सांगा

Rohan Uday Chinchore म्हणाले...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांंनी समाधानी जगण्याचा सोपा उपाय सांगितला आहे. 👌🙏

Unknown म्हणाले...

Kavita rasghrahan

Unknown म्हणाले...

एकदम छान कविता .जीवन जगताना महत्वकांक्षा जरुर असावी पण आहे त्या गोष्टीत समाधान मानावे.तरच माणूस सुखी राहतो .अप्रतिम कविता

Unknown म्हणाले...

वस्तू साधन, या मध्ये आराम आहे सुख नाही,. सुख शांति विचारात आहे,मानन्यावर आहे.ओम शांति.

Unknown म्हणाले...

सन १९८३ला सातवीला कविता होती.शिक्षकांनी शिकवण्यास तीन दिवस लागले.

Unknown म्हणाले...

खुप छान कविता

T Track Studio म्हणाले...

झोपडीतील सुखे

Unknown म्हणाले...

कवितेत वास्तविकता आहे पुन्हा पुन्हा वाचावी अशी आहे

Kisan... म्हणाले...

येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी ना बोजा या झोपडीत माझ्या...

खूपच सहजता आहे...

archana gadre म्हणाले...

जर आपण या वेबसाईट वर कवितेचा भावाथॆ दिला तर खुप बरे होईल🙏🙏

Aruna Bhosale म्हणाले...

लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव मिळू शकतो हे पटवून देणारी सुंदर कविता.सुख मानण्यावर असते.

Unknown म्हणाले...

सुंदर कविता, आजही पाठ आहे

Unknown म्हणाले...

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

Unknown म्हणाले...

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

Unknown म्हणाले...

या झोपडीत माझ्या

Hemant G.SALI म्हणाले...

सुख शांति आपल्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे, बाह्य साधनांवर नाही. अधिक मिळवायची महत्वकांक्षा ठेवायला पाहिजे पण मिळेल त्यात समाधान मानून पुढे प्रयत्न करत रहायचे.

Unknown म्हणाले...

साधे राहणीमान याविषयी तुमचे मत लिहा