पैठणी
फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी
माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गुढ़ आहे त्यास
धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली
वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले
कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा
बुधवार, १ ऑक्टोबर, २००८
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
१५ टिप्पण्या:
Thank you! This is one of my all time favorites...
Ajun hi hi kavita vachtanna gahivarun yeta.
The line is 'suvehapani maran ale'. Not 'saubhagyache maran ale.'
@Nikhil1256 दुरुस्ती सुचवल्याबद्दल धन्यवाद! कृपया आपण देवनागरीमध्ये ही दुरुस्ती सुचवू शकाल का?
अहेवपणी आहे ते
अहेवपणि मरण आले ,,, असे आहे
सुक्ष्म
अहेवपणी चा अर्थ काय?
खस-हीन्यात माखली बोटे पैठनीला केंव्हा पुसली asa correct Kara please
पती जिवंत असताना
पती जिवंत असताना
पती जिवंत असताना
खस- हिन्याची माखली बोटे ... असाच उल्लेख हवा आहे.
र्हस्व-दीर्घचे नियम पाळणे आवश्यक. जवळून, गळून,क सूक्ष्म इ.
Pati jivant asatana, maran yene
खुप सुंदर
टिप्पणी पोस्ट करा