तसे माझे शब्द...घनगर्द
ओठांवर येता येता पांढरेभक्क झाले,
हलक्या हलक्या कवड्या झाले,
खुळखुळ वाजायला लागले,
पांढरेशुभ्र बगळे होऊन ओठांवरून उडून गेले....
तेव्हा
मीच मनाचे ओठ घट्ट मिटून टाकले क्षितिजासारखे.
काही मराठी कविता
कविता म्हणजे वर उधृत केलेलं सगळं काही आहेच, पण त्यापलिकडेही काहीतरी आहे जे एक संवेदनाक्षम मन सहज जाणू शकतं. आणि त्या मनाला व्याख्या समजावून घेण्याची आवश्यकता नाही!
नामवंत कवींच्या जमतील तशा एकत्र संकलित केलेल्या कवितांचा हा संग्रह आहे. हा संग्रह वाढवण्य़ासाठी आपल्याला जर ह्या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर अवश्या संपर्क साधा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा