बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

मला टोचते मातीचे यश - विंदा करंदीकर

श्रावणातले ऊन रेशमी
आकाशाला बांधून ठेवी
घट्ट धरेशी
सह्याद्रीच्या गळ्यात पडती
श्रावणतल्या सरी सराईत
ओलेत्याने
आणि ओणव्या माळालाही
हंबरणारा अवखळ वारा
ढुशी मारतो भलत्या जागी
अडचणीतल्या पाऊलवाटा
अंग चोरुनी हळूच पळती
माझ्या जवळून
मजला टाळून
- ब्रम्ह जाहले धरणीला वश
अशा प्रसंगी
आत कुठेसे
मला टोचते मातीचे यश

५ टिप्पण्या:

Dhananjay म्हणाले...

Nice! Thanks Kshipra!

kshipra म्हणाले...

शांता शेळके यांच्या बरसात आणि सहजखूण साठी माझ्याकडून धन्यवाद

kshipra म्हणाले...

सध्या जरा हाताशी वेळ आहे त्यामुळे आवडत्या कवितांसाठी वेळ मिळतो आहे.

Dhananjay म्हणाले...

Ur taste of poems is also very good.

nk म्हणाले...

कवितांची निवड फार चांगली आहे