सोमवार, ३० एप्रिल, २००७

कीर्ति - भाऊसाहेब पाटणकर

एकदा मेल्यावरी मी परतुनी आलो घरी
तेच होते दार आणि तीच होती ओसरी ।

होती तिथे तसबीर माझी भिंतीवरी टांगली
खूप होती धूळ आणि कसर होती लागली ।

द्रवलो तिला पाहून, होती शेवटी माझीच ती
दिसली मला पण आज माझ्या प्रेताहुनी निस्तेज ती ।

बोलली की हीच का, माझ्यावरी माया तुझी
गेलास ना टाकून, होती प्रत्यक्ष जी छाया तुझी ।

बोलली हे ही तुला का सांगावया लागते
मेल्यावरी जगण्यास वेड्या, खूप कीर्ति लागते ।

होऊनी स्वार्थांध नुसता, कैसातरी जगलास तू
आहेस का, केला कुठे, जगण्याविना पुरुषार्थ तू? ।

समजली ना, आता तरी, आपुली स्वत:ची पायरी
समजले ना काय मिळते, नुसती करूनी शायरी? ।

ओशाळलो ऐकून, नेली तसबीर मी ती उचलुनी
सांगतो ह्याची तिथे, चर्चाही ना केली कुणी ।

३ टिप्पण्या:

netaji म्हणाले...

Excellent,unbeleavable........
I have no words for this one.....

Shivaji Laxman Todkar म्हणाले...

khoop chhan. Punha punha surat ganyacha prayatna kela. Pathantar karava itki bhavli manala. Khoop Chhan. khoopach Chhan.

Shivaji Laxman Todkar म्हणाले...

Kavita Khoop Chhan Vatli. Mee tee manapasoon Vachli. Paathantar Karnyacha prayatna karat aahe. Khoop manala shivoon geli. Khoopach Chhan.