मंगळवार, १ मे, २००७

अशीच यावी वेळ एकदा - प्रसाद कुलकर्णी

अशीच यावी वेळ एकदा

अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना
असे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना

उशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक
जवळ नसावे चीट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक

मी लज्जित, अवगुंठित आणि संकोचाचा अंमल मनावर
विश्वामधले मार्दव सारे दाटून यावे तुझ्या मुखावर

मनात माझ्या 'तू बोलावे' तुझ्या मनीही तीच भावना
तूच पुसावे कुशल शेवटी, करून कसला वृथा बहाणा

संकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे
समय सरावा मंदगतीने अन प्रीतीचे सूर जुळावे

तू मागावे माझ्यापाशी असे काहीसे निघताना
उगीच करावे नको नको मी हवेहवेसे असताना

हुशार तू पण, तुला कळावा अर्थ त्यातुनी लपलेला
आपुलकीच्या दिठीत भिजवुन मिठीत घ्यावे तू मजला

सचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रितीच्या जलामध्ये
युगायुगांची आग विझावी त्या बेसावध क्षणांमध्ये

शब्दांवाचुन तुला कळावे गूज मनी या लपलेले
मुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले.

८ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

कुणाची कविता आहे ही???

Unknown म्हणाले...

मी त्यावेळी नवोदित होतो....पण ही कविता मनात घर करून गेली होती तेव्हा

महेश कुलकर्णी म्हणाले...

सौमित्र

Unknown म्हणाले...

Salil

andhareraj2001 म्हणाले...

मला खूप अवढते ही कविता

राम कथा म्हणाले...

प्रसाद कुलकर्णी

Unknown म्हणाले...

Sundar...

R म्हणाले...

या कवितेचा खरा कवी कोण आहे?