शुक्रवार, ४ मे, २००७

दुःख घराला आले - ग्रेस

अंधार असा घनभारी
चन्द्रातुन चन्द्र बुडले
स्मरणाचा उत्सव जागुन
जणु दुःख घराला आले

दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला
श्वासानी धरते उचलुन

विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणु ह्रिदयामागुन माझ्या
झाडांची पाने गळती

नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे

२ टिप्पण्या:

bhakit म्हणाले...

Padmakar & Kiran,

Aapla atyant aabhari aahe.
Aaplya ya upakram baddal mazhya shubhecha.

-Bhakit.

अभिजात कविता गणेश गोडसे म्हणाले...

ग्रेस म्हणजे फक्त ग्रेसच