अशी ही दोन फुलांची कथा
अशी ही दोन फुलांची कथा
एक शिवाच्या पदी शोभते । एक शवाच्या माथा ॥
इथला निर्माल्यही सुगंधी,तिथली माळहि कुणी न हुंगी
इथे भक्तिचा वास फुलांना, तेथे नरकव्यथा ॥
जन्म जरी एकाच वेलिवर, भाग्यामध्ये महान अंतर
गूळखोबरे कुणा, कुणाला मिळे पिंड पालथा ॥
दोन फुलांचे एकच प्राक्तन, उच्च नीच हा भास पुरातन
एक शिळेला देव मानिते । एक पूजिते म्रॄता ॥
निर्माल्य कुणी मंदिरातला, अर्पियला गंगामाईला
जरा पलिकडे, स्मशानातला, पाचोळाही वाहत आला
फुलाफुलांची ओळख पटली । हसला जगन्नियंता ॥
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
४ टिप्पण्या:
kharach ashi kalpana ,,, shabdanchi sangad .....
apratim.....
खूपच सुंदर गाणे. खुप दिवसांपासून हवे होते. धन्यवाद.
अतिशय सुंदर कविता
खुप दिवसांपासुन हवी असलेली कविता मिळाली
खुप आनंद झाला
टिप्पणी पोस्ट करा