चिंव् चिंव् चिंव् रे । तिकडे तू कोण रे?
'कावळे दादा, कावळे दादा, माझा घरटा नेलास, बाबा?'
'नाही ग बाई, चिऊताई, तुझा घरटा कोण नेई?'
'कपिला मावशी, कपिला मावशी, घरटे मोडून तू का जाशी?'
'नाही ग बाई मोडेन कशी? मऊ गवत दिले तुशी'
'कोंबडी ताई, कोंबडी ताई, माझा घरटा पाहिलास बाई?'
'नाही ग बाई मुळी नाही तुझा माझा संबंध काही?'
'आता बाई पाहू कुठे? जाऊ कुठे? राहू कुठे?'
'गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला'
चिमणीला मग पोपट बोले ' का गे तुझे डोळे ओले?'
'काय सांगू बाबा तुला? माझा घरटा कोणी नेला?'
'चिमूताई चिमूताई, माझ्या पिंजऱ्यात येतेस, बाई?'
'पिंजरा किती छान माझा! सगळा शीण जाईल तुझा'
'जळो तुझा पिंजरा मेला! त्याचे नाव नको मला !'
'राहीन मी घरट्याविना!' चिमणी उडून गेली राना.
मंगळवार, ६ मार्च, २००७
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
११ टिप्पण्या:
*घरटे नसले तरी चालेल,पण कोणाचीही गुलामगिरी नको स्वतंत्रता हवी.*
Dying to find this poem ..it's absolutely me
स्वाभिमानी चिमणी यात छान नमूद केली आहे.
Nice poem
घरटे तर हवेच ... कारण तिचा तो पहिला अधिकार आहे . मात्र तिला गुलामगिरीही नकोय .. स्वातंत्र्य हवे .
Was looking for many years.thanks for uploading
खुप शोधत होते हि कविता. मुलींना सांगण्यासाठी. कवी कोण हे ही विसरले होते. शाळेच्या पाठ्यपुस्तकात होती. खुप खुप आभार
खुप खुप शोधत होते ही कविता. धन्यवाद.
मला शालेय जीवनात ही कविता होती आणि चिमणीला मग पोपट बोले इथपासून पुढची सगळी कविता मला अजुनही तोंडपाठ आहे. तशा मला लहानपणी अभ्यासलेल्या खुप साऱ्या कविता अजुनही चांगल्या पाठ आहेत.
ही कविता वाचून शालेय जीवनातील दिवस आठवले खूप छान.
Standard 2nd
Maharashtra board
टिप्पणी पोस्ट करा