निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे
झुबे लालसर ल्यावे कानी,
जरा शिरावे पदर खोवुनी
करवन्दीच्या जाळिमधुनी.
शीळ खोल ये तळरानातून
भण भण वारा चढणीवरचा,
गालापाशी झिळमिळ लाडिक,
स्वाद जिभेवर आंबट कच्चा.
नव्हती जाणिव आणि कुणाची,
नव्हते स्वप्नही कुणी असावे,
डोंगर चढणीवरी एकटे
किती फिरावे,उभे रहावे.
पुन्हा कधी न का मिळायचे ते,
ते माझेपण, आपले आपण,
झुरते तनमन त्याच्यासाठि
उरते पदरी तिच आठवण,
निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांची,
टपोर हिरव्या करवंदाची...
शुक्रवार, ३० मार्च, २००७
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
३ टिप्पण्या:
खूप आवडलेली कविता..
डोंगरटेकड्या, तळरानातल्या त्या भणाण वार्याबरोबरच
अनेक अंगांनी स्वतःची स्वतःला आठवण करुन देणारी!!
Khoop sunder.....std 7th la hoti
बालपणीची कविता... अजूनही आवडते,स्वत:ला शोधणारी, ते माझेपण...आपले आपण.
टिप्पणी पोस्ट करा