विस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट
बावरा पक्षी
पाण्यात एक सावली, हले बाहुली
थरकते ऊन
ही माल्हन म्हणते गान, चंद्र माळून
बहकते रान
झाडीत हूल बिथरते, गंध विखरते
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सन्नाट
बावरा पक्षी
बुधवार, १४ मार्च, २००७
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
३ टिप्पण्या:
ह्या गाण्याची mp3 मिळेल का ? मी कॉलेजला असताना हा अलबम आला होता. माझ्या कडे कॅसेट होती. पण ती कॅसेट कुठं हरवली कळलेच नाही. मी खुप शोध घेतला इंटरनेट वर पण कुठेच नाहीत ही गाणी.
कोण गायक ?
सन्नाट नाही , सैराट
टिप्पणी पोस्ट करा