सांगा कस जगायचं?
सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!
डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!
कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!
पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!
पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!
सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!
गुरुवार, २९ मे, २००८
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
३ टिप्पण्या:
Right now it is situation in the Mumbai. This poem really speak, what our heart want to say?
I like it. Thank u very much to create this blog. This is my 1st visit.
thanks for this blog....after a long gap m again with padgaonkar,,
thanks for the same...
plz add 'prem mhanje prem mhnaje'
श्रीमती दिपाली आणि प्रणाली, धन्यवाद.
प्रणाली, "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे" असा गुगलवर शोध केला तेव्हा ४९९९० पाने सापडली. त्यात एक आणखी पान वाढून फारसं काय साध्य होणार? आमचा उपक्रम सहजसाध्य न होणा्या कवितांचा संग्रह करावयाचा आहे. अर्थात काही अपवाद राहून गेले आहेत. असो.
पुन्हा एकदा धन्यवाद!
टिप्पणी पोस्ट करा